Jalgaon Train-Truck Accident : जळगाव जिल्ह्यातील बोदवडजवळ मुंबई- अमरावती एक्सप्रेसला अपघात झालाय. या अपघातामुळे (Accident News) रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलंय. या अपघातामुळे मुंबईवरून(Mumbai) नागपूरकडे (Nagpur) जाणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक संपूर्णतः कोलमडलंय. या अपघातामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या अकोला, मलकापूर आणि इतर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्यायेत. तर या अपघातामुळे एकूण पाच गाड्या इटारसीमार्गे नागपूरला वळवण्यात आल्यायेत. शिवाय इतर दोन गाड्या अनिश्चित काळासाठी विलंबाने धावणार आहेत. तर भुसावळ बडनेरा ही पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे. 

Continues below advertisement


अपघातामुळे इटारसीमार्गे नागपूरकडे वळवलेल्या गाड्या 


-मुंबई हावडा शालीमार 18029
-पुणे नागपूर हमसफर एक्सप्रेस 22141
-कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस 11039
-अहमदाबाद चेन्नई नवजीवन एक्सप्रेस12655
-मुंबई हावडा दुरांतो 12261


अनिश्चित काळासाठी एक विलंबाने धावत असलेल्या गाड्या : 


-अहमदाबाद नागपूर प्रेरणा एक्सप्रेस- 22138
-मुंबई हावडा मेल- 12809


रद्द झालेली गाडी :


भुसावळ बडनेरा मेमो पॅसेंजर 61101


एक्सप्रेसची अशी आहे स्थिती 


पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस ही सकाळी चार वाजता होती ती वरणगाव येथे थांबून आहे 


साडेचार वाजेची शालीमार एक्सप्रेस ही अजूनही भुसावळ येथे थांबली आहे. 


सहा वाजताची नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस ही तीन तासापासून जळगाव रेल्वे स्थानक येथे थांबली आहे 


सकाळी तीन वाजताची प्रेरणा एक्सप्रेस अजूनही बोदवडच्या जवळ थांबली आहे 


सकाळची चार वाजताची हावडा मेल वरणगाव येथे थांबली आहे 


मुंबई नागपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 


अनेक एक्सप्रेसचाही खोळंबा, प्रवाशांना मोठा त्रास


बोदवड येथे धान्याचा ट्रक मुंबई-अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये धडकल्यामुळे रेल्वे यंत्रणा ही विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना रेल्वे उशिरा असल्याने त्रासाचा सामना करावा लागत आहे. या अपघातामुळे नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस, सुरत पॅसेंजर, हावडा मेल, पुरी सुपरफास्ट, एक्सप्रेस शालिमार एक्सप्रेस,महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या जवळपास दोन ते तीन तासाने उशिराने असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.


हे ही वाचा