एक्स्प्लोर

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' चार आमदारांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये 31 जुलै रोजी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यासाठी नेत्यांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये 31 जुलै रोजी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. शिवेंद्रराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्यानंतर ते बाहेर पडणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. मात्र शिवेंद्रराजे यांचा प्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.   शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न खुद्द शरद पवार यांनी केले होते. मात्र वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. अखेर शिवेंद्रराजे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे नवी मुंबईतील आमदार संदीप नाईक देखील भाजप प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 52 नगरसेवक देखील राजीनामा देऊन भाजपमध्ये डेरेदाखल होणार आहेत, अशीही माहिती आहे.  त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जाऊन शिवसेना भाजपची सत्ता अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक मधुकर पिचड आणि अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड यांनी देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. तेही 31 जुलैला प्रवेश करणार आहेत.  आयुष्यात काही निर्णय घ्यायचे असतात. गेल्या 35 वर्षात मधुकर पिचड यांनी खूप काम केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही भक्कम साथ दिली. माझ्या आमदारकीपेक्षा जास्त मतं यावेळी दिली. मात्र गेल्या पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडला असून रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक विकासाच्या योजना विरोधी पक्षात असल्यानं पूर्ण होत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला यश मिळालं आणि आगामी विधानसभेत हेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल अशी भावना कार्यकर्त्यांची झाली असून तालुक्याचा विकास व्हावा ही जनतेची भावना ओळखून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं आमदार वैभव पिचड यांनी सांगितलं होतं. तर  काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोळंबकर यांनी आजच आपला राजीनामा प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त केला आहे.  'मी काँग्रेसवर नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं म्हणून मला पक्षाने बाहेर केलं' असं म्हणत कालिदास कोळंबकरांनी मागेच भाजप प्रवेशाची घोषणा केली होती.  कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Embed widget