एक्स्प्लोर

मिलिंद देवरांविरोधात गुन्हा दाखल, धार्मिक तेढ निर्माण केल्याचं वक्तव्यं केल्याचा आरोप

निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी आचारसंहिता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेने मिलिंद देवरा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

मुंबई : दक्षिण मुंबईचे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 एप्रिल रोजी झवेरी बाजार येथे व्यापारांशी संवाद साधताना त्यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचं वक्तव्यं केल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. या विधानाविरोधात शिवसेना उमेदवारांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली होती.  त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पोलिसांनी मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. VIDEO | बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मिलिंद देवरांनी काय म्हटलं शिवसेनेबद्दल? | मुंबई | एबीपी माझा जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.  यामुळे  मिलिंद देवरा यांच्या विरोधात एल टी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी आचारसंहिता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेने मिलिंद देवरा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. शिवसेनेच्या वतीने अ‍ॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी 8 एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यासोबत देवरा यांच्या भाषणाची सीडीही पाठवली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि 171 आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. मिलिंद देवरा हे दिवगंत काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे सुपूत्र आहेत.  2009 साली ते दक्षिण मुंबईतून निवडून लोकसभेवर गेले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मोहन रावले यांचा पराभव केला होता.  त्यानंतर 2014 साली मोदी लाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. मिलिंद देवरा यांनी संपुआ दोनच्या कार्यकाळात केंद्रात मंत्रीपद भूषवले आहे. ते सध्या मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? आकडेवारी सांगत कर्जाबाबत म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? कर्जाबाबत म्हणाले...
CJP Controversy : सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...

व्हिडीओ

Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? आकडेवारी सांगत कर्जाबाबत म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? कर्जाबाबत म्हणाले...
CJP Controversy : सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
Nagpur DJ Ban : इकडे DJ वरुन पुण्यात गोंधळ, तिकडे नागपुरात डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज निर्णय
इकडे DJ वरुन पुण्यात गोंधळ, तिकडे नागपुरात डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज निर्णय
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
Devendra Fadnavis on Eknath Shinde and Ganesh Naik: एकनाथ शिंदे की गणेश नाईक, सर्वात समजूतदार कोण वाटतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'माझ्यासारख्या छोट्या नेत्याला...'
एकनाथ शिंदे की गणेश नाईक, सर्वात समजूतदार कोण वाटतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'माझ्यासारख्या छोट्या नेत्याला...'
Devendra Fadnavis and Krishnaraj Mahadik: मनसेविरुद्धच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण कृष्णराज महाडिकांवर का रागावले? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
मनसेविरुद्धच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण कृष्णराज महाडिकांवर का रागावले? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
Embed widget