Maharashtra Vidhansabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Vidhansabha Election 2024) बिगुल वाजलं असून सर्व पक्ष, नेते, कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. इच्छुक उमेदवारांकडून आपण केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणं सुरू आहे. तसेच जनता-जनार्दन आपल्यावर प्रसन्न व्हावी, यासाठी नेत्यांनी आता थेट, देवालाच साकडं घालण्यास सुरूवात केली आहे. निवडणूक काळात अनेक नेत्यांनी आपली कुंडली शुद्ध करून घेण्यास सुरूवात केली असून बगलामुखी, सुदर्शन याग, बटुक भैरव, शतचंडी हवनला नेत्यांची सर्वाधिक पसंती असल्याचं ज्योतिषाचार्यांनी सांगितलं आहे. तसंच स्वबळ वाढवण्यासाठी आणि आकर्षण वाढावे यासाठी नेते अनुष्ठान तर करतातच शिवाय अर्ज दाखल करताना नेते शुभ मुहूर्तासाठी सध्या ज्योतिषाचार्यांच्या अपॉईंटमेंट घेत आहेत. याचदरम्यान इच्छुक उमेदवारांनी नेमका कधी अर्ज करावा, याबाबत वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी महत्वाची माहिती दिली आहे.


अर्ज दाखल करताना नेत्यांची शुभ मुहूर्ताला पसंती-


मिथुन, सिंह, कुंभ, राशीच्या इच्छुक उमेदवाराने 22 व 23 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करावा. कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशीच्या इच्छुक उमेदवारांनी 24 आणि 25 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करावा. सिंह, तूळ, मेष, धनु राशीच्या इच्छुक उमेदवारांनी 26 आणि 27 या तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करावा. कन्या, वृषभ, वृश्चिक, मकर राशीच्या इच्छुक उमेदवारांनी 28 आणि 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करावा. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रामुख्याने प्रत्येक इच्छुक उमेदवारने आपल्या चंद्रबळ अनुकूल आहे त्या दिवशीच नामनिर्देश अर्ज दाखल करायचे आहेत. सूर्याचा होरा असे तो राजे सेवेसाठी उत्तम मानला जातो. चंद्राचा होरा सर्व कार्यासाठी उत्तम मानला जातो. तर या काळामध्ये जर आपण फॉर्म भरला असता आपले ग्रह बळ जास्त वाढते व आपल्याला चांगला प्रतिसाद सर्वसाधारण मिळतो कुठलीही कार्य करत असताना सकारात्मक ऊर्जा असेल, तर काम आपण जास्त जोमाने करू शकतो, असं वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितले. 


विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार?; ज्योतिषाचार्य काय म्हणाले?


ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीचे भाकीत वर्तविताना राजकीय पक्षाचे बळ, पक्षप्रमुखाचे ग्रहमान आणि तो उमेदवार किती प्रबळ आहे, यावर अनेक गोष्टी ठरतात. ज्योतिषशास्त्रानुसार महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांचे बळ काठावर आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कुंडलीनुसार त्यांचे ग्रह प्रबळ आहेत. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कुंडली संमिश्र ग्रहमान दर्शवित आहे. शरद पवार गट आणि  काँग्रेस पक्षाचेही ग्रहमान चांगले असून त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगल्या जागा मिळण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार राज्यात पुन्हा महायुती सरकारच सत्तेत येईल, असा अंदाज ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी वर्तविला आहे.


संबंधित बातमी:


Maharashtra vidhan sabha election 2024: फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?


संबंधित व्हिडीओ: