Maharashtra Politics अमरावतीमहायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चांसदर्भात एक चर्चा समोर आली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देताना आमच्या माणसांनी त्याग केल्याची आठवण करुन दिल्याची माहिती महायुतीच्या नेत्यानं एबीपी माझाला दिली होती. यासंदर्भात बोलताना अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी भाजप नेतृत्वाच्या सुरात सूरत मिसळवत भाष्य केले आहे.


सर्वात जास्त आमदार असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी मोठा त्याग करून उपमुख्यमंत्री पद स्विकारले आहे. भाजपने त्याग करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही माहिती आहे. महायुतीमध्ये मजबूत चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जातं. किंबहुना एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री पदाची संधी देणं, हा त्याग देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. 


श्रीकांत भारतीय आणि त्यांचे भाऊ कटप्पाच्या भूमिकेत-रवी राणा 


ज्यांनी भाजपचे कार्यालय उघडल त्यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात काम केलं. भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय आणि त्यांचे भाऊ तुषार भारतीय हे कटप्पाच्या भूमिकेत आहे. त्यांनी भाजप सोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळे या दोघांवरही कारवाई केली पाहिजे, अशी मागणी ही आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी  केली आहे. तसेच अचलपूर, दर्यापूर, मेळघाट हे मतदारसंघ आम्हाला मिळावे, ही आमची मागणी आहे. असेही ते यावेळी म्हणाले. 


काय म्हणाले अमित शाह?


"शिंदे जी, या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्त्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे जागावाटपात मित्रपक्षांना झुकतं माप द्या."


अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीच्या माध्यमातूनच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे अजित पवारांना सत्तेत सामील होताना भाजपने जो शब्द दिला आहे तो शब्द पाळणार असल्याची माहिती आहे. त्याचमुळे आता भाजप नेते अमित शाहांनी स्वतः जागावाटपामध्ये सक्रिय भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपद हे शिंदेंकडे आहे, त्यामुळे मित्रपक्षांना त्यांनी जास्तीत जास्त जागा द्याव्यात असा आग्रह आता भाजपकडून केला जात आहे. 


हे ही वाचा