एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

तिक पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं डावललं जात असल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. सांगलीची जागा शेतकरी संघटनेला देण्यास दादा कुटुंबाचा आक्षेप होता. सांगलीच्या जागेवरुन काँग्रेसमध्ये घमासान सुरु होतं. काँग्रेसची परंपरा असलेली सांगलीची जागा द्यायला अनेक जणांचा विरोध आहे.

सांगली : दिंवगत वसंतदादा पाटील यांचे नातू केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि महाआघाडीला हा मोठा धक्का मानला जातो. प्रतिक पाटील यांनी अद्याप कोणत्या पक्षात जाणार हे जाहीर केलेलं नाही.

"मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे, काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले आहे, अशी घोषणा प्रतिक पाटील यांनी सांगलीतील एका मेळाव्यात केली. काँग्रेसला आज वसंतदादांची गरज वाटत नाही, अशा शब्दात प्रतिक पाटलांनी काँग्रेवर हल्लाबोल केला आहे. वसंतदादांच्या नावाने सामाजित क्षेत्रात काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

सांगलीची जागा शेतकरी संघटनेला देण्यास दादा कुटुंबाचा आक्षेप होता. सांगलीच्या जागेवरुन काँग्रेसमध्ये घमासान सुरु होतं. काँग्रेसची परंपरा असलेली सांगलीची जागा द्यायला अनेक जणांचा विरोध आहे. याशिवाय प्रतिक पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं डावललं जात असल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आज अखेर प्रतिक पाटलांनी काँग्रेसचा राम राम ठोकून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कोण आहेत प्रतिक पाटील?

- काँग्रेसचे सांगलीचे माजी खासदार - माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री - काही काळ केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्रीपदाची जबाबदारी - माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू - गांधी घराण्याशी निष्ठावान म्हणून ओळख - 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून पराभव

याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुजय विखे यांना भाजपने अहमदनगरमधून उमेदवारीही जाहीर केली. याशिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजप प्रवेश केला आहे.

साताऱ्यातील फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते भाजपचे माढ्यातले उमेदवार असणार आहेत. चंद्रकांत पाटलांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंविरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषणUddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलंAjit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझाBaba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Embed widget