UP Election 2022: उत्तर प्रदेशची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाची असून अनेक लढती या चुरशीने होण्याची शक्यता आहे. अशावेळी ईव्हीएम मशिनमध्ये काही गडबड वा फेरफार होऊ नये म्हणून भाजप वगळता सर्वच पक्षांनी खबरदारी घेतली आहे. उत्तर प्रदेशातील मतमोजणी केंद्रांना कार्यकर्त्यांनी सुरक्षा कवच प्रदान केलं असून या ठिकाणी 24 तास पहारा दिला जात आहे. 

Continues below advertisement

स्ट्रॉंग रूमला भाजपा वगळता इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचं सुरक्षाकवच असल्याचं चित्र उत्तर प्रदेशमध्ये दिसून येतंय. मतमोजणी केंद्रावर कार्यकर्ते 24 तास ठाण मांडून बसले आहेत. कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या शिफ्ट करून दिल्या जात आहेत. कुठली एखादी गाडी गेली किंवा इतर साहित्य आलं तर त्याची चौकशी हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. ईव्हीएममध्ये गडबड होण्याच्या भीतीने हे सुरक्षाकवच दिलं जातंय . या कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था संबंधित पक्षाकडून केली जात आहे. 

गेल्यावेळच्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार केल्याचा आरोप सर्व विरोधी पक्षांनी केला होता. त्यातच मतदान झाल्यानंतर अनेक ईव्हीएम मशिन भाजप नेत्यांच्या खासगी गाड्यांमध्ये आढळल्याचा आरोपही अनेकदा करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ईव्हीएम मशिनमध्ये काही फेरफार होऊ नये म्हणून भाजप वगळता सर्व पक्षांनी कंबर कसली आहे.  

Continues below advertisement

मॅजिक फिगर 202देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. या 403 जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 202 जागा जिंकाव्या लागतील. जो पक्ष 202 जागा जिंकेल तो पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.

एक्झिट पोल काय सांगतोय? उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एक्झिट पोलनुसार भाजप 228 ते 244 तर समाजवादी पक्ष 132 ते 148 जागा जिंकण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या: