पणजी: गोव्यासोबतच संपू्र्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर बाजी मारणार की भाजप त्यांच्यावर वरचढ ठरणार हे अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. पणजीऐवजी बिचोलीतून उमेदवारी घ्यावी हा भाजपचा प्रस्ताव उत्पल पर्रिकर यांनी नाकारला आणि अपक्ष निवडणूक लढवली. उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. 

पणजी गोव्याच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी देखील राहिली आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा हा मतदारसंघ. पण या मतदारसंघातून भाजपने उत्पल पर्रिकरांना डावलून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाबूश मोन्सेरात यांचे तिसवाडी तालुक्यातील तालीगांव, साताक्रुझ, सातआंद्रे या ठिकाणी समर्थक आमदार आहेत. शिवाय, मोठ्या संख्येनं असलेल्या कॅथलिक मतदारांचा असलेला पाठिंबा ही देखील त्यांच्या जमेची बाजू. केवळ पक्षनेत्यांची मुलं आहेत म्हणून उमेदवारी देण्याची भाजपमध्ये पद्धत नाही, असं भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. 

भाजपने चुकीच्या उमेदवाराला तिकीट दिले; पर्रिकरांचा आरोपया भागातून भाजपने ज्या उमेदवाराला तिकीट दिले आहे ते डिफॉल्टर आहेत. त्यांनी नेहमीच भाजपच्या विरोधात काम केले आहे. येथील मतदार त्यांना मतदान करू इच्छित नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांनाही त्यांचे काम करायचे नाही. त्यांच्यावर बलात्कार आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. मी राजीनामा देताना पक्षाला सांगितले होते की, या जागेवर चांगला उमेदवार द्या, मी घरी जाईन, असं उत्पल पर्रिकर म्हणाले होते. 

बहुमतासाठी 21 जागांची गरजगोव्यात विधानसभेच्या 40 जागा असून बहुमतासाठी 21 जागांची गरज आहे. 40 जागांसाठी गोव्यात एकाच टप्प्यात मतदान झाले आहे. 

एक्झिट पोल काय सांगतोय?एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्व्हेनुसार गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असून त्याला 13 ते 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काँग्रेसला 12 ते 16 जागा आणि आम आदमी पक्षाला 1 ते 5 जागा मिळू शकते. त्याचवेळी महाराष्ट्र गोमंतवादी पक्षाला 5 ते 9 जागा मिळण्याची शक्यता असून हाच पक्ष किंगमेकरची भूमिका बजावण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या: