Punjab Election Result 2022: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यातील निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांत सर्वांसमोर येणार आहे. उद्यापर्यंत कोणत्या राज्यांत, कोणाला बहुमत मिळेल, तर कुठे कोणतं सरकार स्थापन होणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान पंजाबचा विचार करता याठिकाणी यंदा सत्तापालट होण्याची दाट शक्यता आहे. एक्झिट पोलमध्ये आप पक्षाला बहुमत मिळाल्याने काँग्रेस तसंच अकाली दलातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


पंजाबमध्ये 117 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मतदारांनी यावेळी समिश्र प्रतिसाद दर्शवल्याने 65.32 टक्के मतदान झाले होते. दरम्यान पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी याठिकाणी प्रचार केला होता. दरम्यान काँग्रेस पक्षाचा विचार करता सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर मोठी जबाबदारी असून या निवडणूकीसाठी तेच पक्षाचा चेहरा आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चमकोर साहिब आणि भदौर अशा दोन ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेसचा आणखी एक मोठा चेहरा म्हणजे नवज्योत सिंह सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून उभे आहेत. तर यंदा एक्झिट पोलमध्ये विजयी आप पक्षाचा मोठा चेहरा म्हणजे भगवंत मान हे धुरी मतदार संघातून उभे आहेत. तर नेमकं पंजाबमध्ये कोणत्या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, यावर एक नजर फिरवूया..


पंजाबमध्ये कुणाची प्रतिष्ठा पणाला?  


चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - चमकोर साहिब
चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - भदौर
नवज्योत सिंह सिद्धू (काँग्रेस) - अमृतसर पूर्व
विक्रम मजिठिया (अकाली दल ) - अमृतसर पूर्व
भगवंत मान (आप) - धुरी
कॅ.अमरिंदर सिंह (पीएलसी) - पतियाळा शहर
प्रकाश सिंह बादल (अकाली दल) - लंबी
सुखबीर सिंह बादल (अकली दल) - जलालाबाद
सुखजिंदर रंधावा (काँग्रेस) - डेरा बाबा नानक
मालविका सूद (काँग्रेस) - मोगा


पंजाब निवडणुकांमधील गाजलेले मुद्दे


शेतकरी आंदोलनातील पंजाब
पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद
कॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
अंमली पदार्थांचं सावट
पंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न


2017 मध्ये कुणाला किती मिळाल्या होत्या जागा? - 


2017 च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती. 


हे ही वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha