एक्स्प्लोर

इलेक्शन माझा : तुमच्या डाव्या हाताला तर्जनी नसेल तर शाई कुठे लावतात?

एखाद्या व्यक्तीला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर शाई कुठे लावावी, याबाबत निवडणूक आयोगाने नियम आखून दिले आहेत. डाव्या हाताच्या इतर बोटांना शाई लावण्याचा पर्याय आहे

मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर मतदारराजा कोणाला मतदान करायचं याची आकडेमोड मनातल्या मनात करत आहे. मतदानाच्या दिवशी रांग लावून मतदारराजा मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानाची खूण म्हणून डाव्या हाताच्या तर्जनीला (पहिले बोट) शाई लावण्याची पद्धत आहे. मात्र एखाद्याला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर काय प्रक्रिया केली जाते, याची तुम्हाला कल्पना आहे का? डाव्या तर्जनीवर लावलेली शाई ही मतदान केल्याची खूण आहे. मतदान बुथवर तुमची ओळख पटवून तुम्हाला प्रवेश मिळतो. ईव्हीएमवर बटन दाबून प्रत्यक्ष मतदान करण्यापूर्वीच पुसली न जाणारी शाई तुमच्या डाव्या तर्जनीला लावली जाते. त्यानंतर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचं निशाण तुमच्या नावासमोर घेतलं जातं. त्यानंतर तुम्हाला मतदान करता येतं. ही शाई तुमच्या बोटावर पुढचे काही दिवस टिकून राहते. डावी तर्जनी नसेल तर... मतदान करण्यापूर्वी पोलिंग ऑफिसर तुमच्या डाव्या तर्जनीवर शाई तर लावलेली नाही ना, हे तपासून बघतो. जर शाई असेल, तर याचा अर्थ मतदाराने आधीच मतदान केलं आहे. साहजिकच ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी अपात्र ठरते. डाव्या तर्जनीची तपासणी करु न देणारी व्यक्तीही मतदानासाठी अपात्र असल्याचं पोलिंग ऑफिसर सांगू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर? निवडणूक आयोगाकडे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही इतर बोटाला शाई लावता येते. जर त्या व्यक्तीच्या डाव्या हाताला एकही बोट नसेल, तर त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावली जाते. उजवी तर्जनीही नसेल, तर उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावली जाते. एखाद्या केसमध्ये व्यक्तीला डाव्या किंवा उजव्या अशा कोणत्याही हाताला बोट नसेल, तर कोणत्याही हाताच्या पंजावर बोटाच्या मुळाशी शाई लावली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती

BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

व्हिडीओ

Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke: श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
Indus Water Treaty : सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
Konda Surekha: लेकीचे मुख्यमंत्र्यांवर 200 कोटींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप अन् मंत्री असलेल्या आईची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी!
लेकीचे मुख्यमंत्र्यांवर 200 कोटींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप अन् मंत्री असलेल्या आईची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी!
Mhada Lottery : म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांची घोषणा
गुड न्यूज, म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, मिलिंद बोरीकर यांची घोषणा
Embed widget