एक्स्प्लोर

मोदींच्या प्रचार कार्डवर सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख, निवडणूक आयोगाचा खारमध्ये छापा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार कार्डवर सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख सापडल्याने निवडणूक आयोगाने मुंबईतील खारमध्ये छापा टाकला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार कार्डवर सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख सापडल्याने निवडणूक आयोगाने खारमधील ठिकाणावर छापा टाकला आहे. निवडणूक आयोगाने ही जागा सील केली आहे आणि त्याठिकाणी असलेलं सामानही ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचा प्रचारासाठी वापर न करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र भाजपच्या प्रचार कार्डवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करण्यात आला आहे. ही कार्ड मुंबईतील खारमधील एका ठिकाणी बनवली जात होती. याची माहिती मिळताच निवडणूक आयोगाने त्याठिकाणी छापा टाकला. मात्र ही जागा भाजपचं कार्यालय आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. देशात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान 2 दिवसांवर आलं आहे.  11 एप्रिल रोजी देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यात निवडणूक आयोगानं भाजपवरच स्ट्राईक केला आहे. निवडणूक आयोगानं सर्जिकल स्ट्राईकचा वापर निवडणुकीच्या प्रचारात करण्यास सक्त मनाई केली आहे, मात्र तरी देखील भाजपकडून सर्जिकल स्ट्राईकचा प्रचारात वापर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगानं कारवाई करत ही जागा सील केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget