एक्स्प्लोर

नवलेवाडीतील प्रकाराचा निव्वळ बागुलबुवा, ईव्हीएम बिघडल्याची कुणाचीही तक्रार नाही, आयोगाचं स्पष्टीकरण

काल 21 रोजी सातारा जिल्ह्यातील नवलेवाडीमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींनी केला होता. कोणतंही बटण दाबलं तरी कमळाला मत जात असल्याचा आरोप एका गावकऱ्याने केला होता. मात्र हा आरोप बिनबुडाचा असून ईव्हीएम बिघडल्याची कुणाचीही तक्रार नाही, असे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी येथे काल मतदान सुरु असताना कोणतंही बटण दाबलं तरी कमळाला मत जात असल्याचा आरोप एका गावकऱ्याने केला होता. मात्र त्याने निवडणूक आयोगाकडे किंवा संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित मतदान केंद्राधिकाऱ्याकडे विहित तक्रारच केली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार कांगावा असल्याचं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी गावातील मतदान केंद्रात हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता. मत देण्यासाठी घडाळाच्या समोरील बटण दाबल्यानंतर कमळाला मत जात असल्याचं एका मतदाराच्या लक्षात आल्याचा दावा त्याने केला.  हा प्रकार मतदान केंद्राधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्याला रितसर तक्रार देण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्याने तक्रार न देता प्रसारमाध्यमांना माहिती दिली. प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियात याविषयीच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रकाराची छानणी केल्यानंतर संबंधित मतदाराच्या दाव्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं. मतदानाच्या दिवशी म्हणजे काल 21 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता संबंधित मतदान केंद्रावर सर्व प्रमुख उमेदवारांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम व्यवस्थित काम करत असल्याची शहानिशा करायला सांगण्यात आलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी दिलीप वाघ आणि दीपक पवार हे अभिरुप मतदानाच्या वेळी उपस्थित होते. त्यावेळी सर्व मतदान यंत्रे व्यवस्थित कार्यरत आहेत. त्यामध्ये कोणताही दोष नाही याची खातरजमा त्यांनी केली होती. फक्त ईव्हीएमवरील राजकीय पक्षांच्या चिन्हांप्रमाणेच व्हीव्हीपॅटमधील प्रिंटही योग्य त्या उमेदवाराच्या मताचीच होत असल्याचीही खात्री करण्यात आली होती. दुपारी नवलेवाडीच्या त्या मतदाराने घडाळ्याचं बटन दाबल्यानंतर कमळाला मत जात असल्याचा आरोप केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी दीपक पवार यांनीही दुपारी ईव्हीएमला आक्षेप घेतला. त्यावेळी त्यांना तक्रारीसाठी आवश्यक विहित 15 क्रमांकाच्या जोडपत्रात अर्ज भरून देण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतरही या मतदान केंद्रावर सायंकाळपर्यंत मतदान व्यवस्थित सुरु होतं. कुणाही मतदाराची कसलीही तक्रार आली नाही, असं निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Embed widget