एक्स्प्लोर

मूर्तिजापूरच्या सभेत प्लास्टिक वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसला 10 हजारांचा दंड

मुर्तिजापूरच्या सभेत पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी कायद्याचं राज्य नसल्याचा आरोप करणारी भाषणं केली. मात्र, याच कायद्याचा बडगा प्लास्टिकबंदीचा नियम तोडल्यावर राष्ट्रवादीवर उगारला गेला.

अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमध्ये नऊ ऑक्टोबरला शरद पवारांच्या प्रचारसभा झाली. याच प्रचारसभेत प्लास्टिकबंदी असताना नियम धाब्यावर बसवणं राष्ट्रवादीला चांगलाच महागात पडलं आहे. या सभेत राष्ट्रवादीनं सभेत लोकांसाठी पाणी पिण्यासाठी प्लास्टिक ग्लासचा वापर केला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसला मुर्तिजापूर नगरपालिकेने दहा हजारांचा दंड ठोठावला. राष्ट्रवादीचे उमेदवार रवि राठी यांच्या प्रचारार्थ स्थानिक गाडगेबाबा मैदानावरही सभा झाली होती. ही दंडाची कारवाई मुर्तिजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या पुढाकाराने झाली. नऊ ऑक्टोबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विदर्भातील प्रचार दौर्‍याची सुरुवात अकोल्यातून झाली. या दौऱ्यात वाडेगाव आणि मूर्तिजापूर येथे शरद पवार यांच्या सभा झाल्या. मुर्तिजापूरच्या सभेत पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी कायद्याचं राज्य नसल्याचा आरोप करणारी भाषणं केली. मात्र, याच कायद्याचा बडगा प्लास्टिकबंदीचा नियम तोडल्यावर राष्ट्रवादीवर उगारला गेला. Sharad Pawar Rally | शरद पवारांच्या सभेत प्लास्टिकचा वापर, राष्ट्रवादी काँग्रेसला 10 हजारांचा दंड | अकोला | ABP Majha या सभेसाठी आलेल्या लोकांसाठी पाच हजारांपेक्षा अधिक प्लास्टिक ग्लासचा वापर करण्यात आला होता. या सभेच्यावेळी उपस्थित असणाऱ्या निवडणुक विभागाने राष्ट्रवादीच्या या नियमभंगाकडे डोळेझाक केली. मात्र, माध्यमांनी हा मुद्दा लावून धरल्यावर तात्काळ कारवाई करीत आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसला दहा हजारांचा दंड ठोठावला. आज दुपारी हा दंडाचा मेमो बजावण्यात आला. दरम्यान, दुपारी ही दंडाची रक्कम राष्ट्रवादीकडून तात्काळ भरण्यात आली आहे. मुर्तिजापुरच्या पवारांच्या सभेत या प्रकारामूळे स्थानिक आयोजकांच्या बेपर्वाईमूळे राज्यात अकारण पक्षाचं नाव खराब झाल्याची भावना काही वरीष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. आजच्या मुर्तिजापूरातील कारवाईनं जिल्ह्यातील इतर सभांमध्ये आता प्लास्टिकचा वापर थांबतो काय?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget