एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदेंची मोठी रणनीती, OSD मंगेश चिवटे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला; शिवसेनेच्या उमेदवारांना पाठींबा मिळवण्याच्या हालचाली

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगेंच्या भेटीला

जालना: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अंतरवाली सराटीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मनोज जरांगे यांनी 'अभय' द्यावे, यासाठी हालचाली सुरु असल्याचे समजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे (Mangesh Chivte) यांनी अंतरवाली सराटीत नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सरसकट मराठा आरक्षणाची मागणी बारगळल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंगेश चिवटे यांच्यावरही आगपाखड केली होती. मात्र, तेच मंगेश चिवटे हे बुधवारी पहाटे पुन्हा मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

आंतरवाली सराटीत मनोज जरांगे आणि मंगेश चिवटे यांच्यात काही काळ चर्चा झाली. गेल्या 10 दिवसांतील मनोज जरांगे आणि मंगेश चिवटे यांची ही दुसरी भेट आहे. या भेटीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांची मनधरणी करत असल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करू नये, अशी विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडून जरांगे यांना करण्यात आल्याचे समजते. यावर आता मनोज जरांगे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांची विनंती मान्य केल्यास विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांच्याबाबत मनोज जरांगे यांचे धोरण आजवर नरमाईचे राहिले आहे. त्यामुळे ते आता एकनाथ शिंदे यांची त्यांच्या पक्षाविरोधात उमेदवार न देण्याची विनंती मान्य करणार का, हे पाहावे लागेल.

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मंत्री उदय सामंत यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे आणि पर्यायाने मराठा समाजाचा रोष कमी करण्याच्यादृष्टीने शिंदे गटाने हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. 

मराठा आरक्षणासंदर्भात 500 रुपयांच्या बॉण्डवर जो लिहून देईल त्याला पाठिंबा देणार असल्याचे सांगितल्यानंतर अंतरवली सराटीत उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनावणे, सुरेश वरपूडकर, संगीता ठोंबरे, राहुल पाटील, चंद्रकांत दानवे या बीड जिल्ह्यातील नेत्यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.  

आणखी वाचा

आंतरवाली सराटीत मध्यरात्रीच्या गाठीभेटी सुरुच, शरद पवार गटाचा नेता आणि दानवेंचा विरोधक मनोज जरांगेंच्या भेटीला

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस, 137 कोटी भरण्याचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 : अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
Kagal Vidhan Sabha : कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
महायुतीच्या 182 उमेदवारांची यादी, दिग्गजांना पुन्हा संधी; महाविकास आघाडीची प्रतिक्षा
महायुतीच्या 182 उमेदवारांची यादी, दिग्गजांना पुन्हा संधी; महाविकास आघाडीची प्रतिक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : माझ्यावर कोणताही दबाव नाही; आता माघार नाही - सदा सरवणकरSharmila Thackeray : शिवतीर्थावर शर्मिला ठाकरेंकडून मनसे उमेदवारांचं औक्षणCM Eknath Shinde : आम्हाला लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना भरपूर काही द्यायचं आहेABP Majha Headlines :  2 PM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 : अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
Kagal Vidhan Sabha : कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
महायुतीच्या 182 उमेदवारांची यादी, दिग्गजांना पुन्हा संधी; महाविकास आघाडीची प्रतिक्षा
महायुतीच्या 182 उमेदवारांची यादी, दिग्गजांना पुन्हा संधी; महाविकास आघाडीची प्रतिक्षा
Ajit Pawar camp NCP Candidate list: अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
इंदापूरमध्ये पुन्हा काँटे की टक्कर! हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात तिसऱ्यांदा दत्तामामा भरणे मैदानात
इंदापूरमध्ये पुन्हा काँटे की टक्कर! हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात तिसऱ्यांदा दत्तामामा भरणे मैदानात
Embed widget