Eknath Shinde Mahayuti: महायुतीच्या कल्याणकारी योजनांमुळे विरोधक बिथरले आहेत. त्यांनी एकप्रकारे पराभव डोळ्यांसमोर दिसू लागला आहे. विरोधक आता काहीही उलटसूलट आरोप करु लागले आहेत. खोटं बोला पण रेटून बोला ही महाविकास आघाडीची नीती आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. आज महायुतीकडून रिपोर्टकार्ड सादर करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला.


दसऱ्या मेळाव्याच्या भाषणामध्ये त्यांनी गायीचा संबंध मराठी भाषेसोबत जोडला, अरे काय चाललंय, इतके ते गोंधळून गेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कसं होणार?, असा टोला एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. ते फक्त सीएम-सीएम-सीएम करताय, आम्ही फक्त काम-काम-काम करतोय, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. तसेच लाडकी बहीण योजनेला कुणी टच करायला गेला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार, असा इशारा देखील एकनाथ शिंदेंनी विरोधकांना दिला. 


एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?


- रिपोर्टकार्ड सादर करायला हिंमत लागते.
- विरोधकांनी आमच्या विरोधात एक व्हिडीओ बनवला.
- बनविणारा शुद्धीत होता का ?
- भाषणात राजभाषेवर बोलताना गायीवर बोलले.
- कॉमन मॅन सुपरमॅन झाला पाहिजे.
- सुनील केदारचा माणूस योजनाच्या विरोधात कोर्टात जातो.
- 2 कोटी 30 लाख महिलांच्या खात्यावर पैसे टाकले.
-लाडकी बहीण योजनेला कुणी टच करायला गेला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार...
- पायाभूत सुविधांमध्ये राज्य देशात एक नंबरवर आहे
- कोस्टल, अटल सेतू, मेट्रो, समृद्धीने तुम्ही प्रवास करतात...
- मुंबई पुणे मिसिंग लिंक काम करत आहोत...
- पायाभूत प्रकल्प हे राज्याच्या विकासाला गती देणारे असतात...त्या राज्याची प्रगती वेगवान होते.
- कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते
- दोन वर्षांत सर्व काही केले हे म्हणणार नाही. पण मविआ व महायुती यांच्या कामाची तुलना केली. तर त्यांनी अटल सेतू, मेट्रो कारशेड अशी कामे बंदर केली.
- स्पीड ब्रेकर टाकले
- आम्ही आलो नसतो तर काम सुरु झाले नसते
- मला सांगितले होते कामाला स्थगिती द्या व चौकशी लावा. त्यांच्या बालहट्ट व अहंकारामुळे 17 हजार कोटी रुपये वाढले, हे दुर्दैव आहे...
- विकास विरोधी काम दृष्टीकोन ठेवणे...


संबंधित बातमी:


Ajit Pawar: लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडलेत; महायुतीचं रिपोर्ट कार्ड मांडत अजित पवारांचं टीकास्त्र


ठाकरेंच्या विधानावरुन शिंदे-फडणवीसांना हसू आवरेना, Video: