एक्स्प्लोर

एकनाथ खडसे यांचं नाव पहिल्या यादीत न आल्याने लेवा पाटीदार समाजात तीव्र संताप

संपूर्ण लेवा पाटीदार समाज हा भाजपच्या पाठीशी उभा आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना भाजपाने जर उमेदवारी दिली नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भोरगाव लेवा पाटीदार समाजाचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी भुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

भुसावळ : भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव न आल्याने मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपा कार्यकर्ते तसेच लेवा पाटीदार समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये लेवा पाटीदार समाज मोठ्या प्रमाणात विखुरला गेला आहे. संपूर्ण लेवा पाटीदार समाज हा भाजपच्या पाठीशी उभा आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना भाजपने जर उमेदवारी दिली नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भोरगाव लेवा पाटीदार समाजाचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी भुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. आमचा समाज नेहमी भाजपाला साथ देणारा आहे. खडसे यांना जे तिकीट अजूनपर्यंत दिलेलं नाही ते न्यायपूर्वक आणि सन्मानपूर्वक द्यावं लागेल. पहिल्या यादीत खडसे यांना तिकीट न दिल्याने संपूर्ण समाजाला प्रचंड मनस्ताप झाला आहे, असेही रमेश विठू पाटील म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लेवा पाटीदार समाज हा मोठ्या संख्येत असल्याने लेवा पाटीदार समाज काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे यांनी उमेदवारी अर्ज भरला दरम्यान,  एकनाथ खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. भाजपने जाहीर केलेल्या यादीत त्यांचं उमेदवार म्हणून नाव नसल्याने नाराज झालेल्या खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या समोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. खडसे म्हणाले की, गेली चाळीस वर्ष आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो. इतर पक्षातून अनेकवेळा मंत्री पदापासून वेगवेगळी प्रलोभने आपल्याला आली. मात्र आपण पक्षाची बांधिलकी कधीही सोडली नाही. हे सगळं करून झाल्या नंतर बाहेरच्यांच्या आरोपांवरून कोणतीही चूक नसताना आपल्याला  तीन वर्षांच्या पासून मंत्री पदावरून दूर केलं गेलं, असे खडसे म्हणाले. भोसरी जमीन प्रकरण आणि दाऊदशी संभाषणाच्या कथित प्रकरणात विनाकारण आपल्यावर आरोप झाले चौकशीत काहीही आलं नाही. या घटनांमध्ये आपल्यावरील आरोप कोणी सिद्ध करून दाखविल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ असं खडसे यांनी म्हटलं आहे.  आपल्याला तिकीट मिळो अथवा न मिळो जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा यावेळी खडसे यांनी केला. गेली चाळीस वर्ष जनतेने साथ दिल्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो असल्याने सांगत खडसे यांनी जनतेचे आभार मानले. पुढील काळात देखील साथ जनतेने द्यावी असं भावनिक देखील खडसे यांनी यावेळी केलं. यादीत नाव नसल्याने निराश झालेल्या खडसे म्हणाले की, चाळीस वर्ष आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला असं वागवलं गेलं, या बाबत मी माझ्या 'आकां'ना विचारणार आहे. माझा गुन्हा काय ते तरी सांगावं, असंही खडसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena: संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Embed widget