एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा बडगा सुरु, 60 हजार शासकीय वाहने ताब्यात

आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts)ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकांची आदर्श आचारसंहिता संपूर्ण राज्यात लागू होताच राज्य निवडणूक आयोग जोमाने कामाला लागलं आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, शासकीय सार्वजनिक /खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरण यांसारख्या अनेक बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींची शासकीय वाहने काढून घेण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेचा बडगा सुरु झाला आहे. सरकारी कार्यालये ओस पडण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या कामासाठी महामंडळ, जिल्हा बँका, सहकारी संस्था आणि इतर सरकारी विभागाचे वाहन महसूल विभागाने काढून घेतली. राज्य निवडणूक आयोगाकडे आलेल्या माहितीनुसार राज्यातील जवळपास साठ हजार वाहन महसूल विभागाने आपल्या ताब्यात घेतली आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात असंख्य चौकशा, प्रस्ताव राज्यभरातील शासकीय कार्यालयात मुख्यमंत्री कार्यालयाकडून आले. तसेच कोणती कामे करावीत किंवा करु नये याचे स्पष्टीकरण आयोगाकडून मागितलं  आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts)ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.nic.in वर निवडणुकीसंदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या गोष्टींवर करडी नजर 
  • फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील प्रचारावर, पेड न्यूजवर निवडणूक आयोगाची करडी नजर
  • इव्हीएमची मूव्हमेंट पाहण्यासाठी जीपीएसचा वापर केला जाईल
  • मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येणार
  • निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबात सामान्य नागरिकही आयोगाकडे थेट तक्रार करु शकणार, अॅपवरील तक्रारदाराचं नाव गुप्त राहणार, 100 मिनिटांच्या आत अशा तक्रारींना प्रतिसाद आयोगाचे अधिकारी देणार.
  • मतदानाच्या 48 तास आगोदर लाऊड स्पीकरची परवानगी नसेल
  • रात्री दहानंतर प्रचाराला मुभा नाही, रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही
लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या तारखा
  • पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान
  • दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान
  • तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान
  • चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान
संबंधित बातम्या लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी ईव्हीएमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे महत्त्वपूर्ण निर्णय

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी

लोकसभा निवडणूक 2014 : देशभरातील पक्षीय बलाबल

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget