East Nagpur Vidhan Sabha Constituency : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु होती. दरम्यान या निवडणुकीच्या निकालाचे अंतिम कौल हाती आले आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बहुतांश ठिकाणी दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे. तर महायुतीला (Mahayuti) यंदा अभूतपूर्व यश मिळाले आहे.
दरम्यान, देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर(Nagpur)जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी एक असलेल्या नागपूर पूर्व मधून भाजपने तब्बल एक लाखांच्या मताधिक्याने जिंकेल आहे! नागपूर पूर्व मधून भाजप राज्यातील सर्वाधिक विक्रमी मताधिक्याने जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. यात 1 लाख 5 हजार मतांच्या मोजणीत भाजपचा मताधिक्य 60 हजार पेक्षा जास्त असून अजूनही 1 लाख 25 हजारांची मतमोजणी शिल्लक आहे. त्यामुळे नागपूर पूर्व मधून भाजपचे कृष्णा खोपडे एक लाख पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील अशीच शक्यता आहे. तर काँग्रेससह महाविकास आघाडीने नागपूर पूर्व मधून अक्षरशः पळ काढला आहे. आमच्या विकास योजनांच्या झंजावाता पुढे विरोधक चित झाल्याची प्रतिक्रिया नागपूर पूर्व मधील भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांनी दिली आहे.
कृष्णा खोपडे यांचा विजयाचा चौकार
दरम्यान, नागपुरातील 12 मतदारसंघापैकी गेल्या तीन टर्म पासून भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केलेल्या पूर्व नागपुरात यंदा निवडणुकीची चुरस पाहायला मिळली आहे. कारण एकीकडे भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे विजयाचा चौकार लावण्यासाठी मैदानात उतरले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांनी खोपडे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होतं. एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये प्रमुख लढत रंगली असताना या मतदारसंघात बंडखोरांचे मोठे आव्हन कळीचा मुद्दा ठरला होता. कारण दोन्ही प्रमुख उमेदवारांसमोर महायुती आणि मवितील बंडखोरांचे मोठे आव्हान असणार होते. मात्र हे आव्हन मोडीत काढत नागपूर पूर्व मधून भाजप राज्यातील सर्वाधिक विक्रमी मताधिक्याने भाजपने विजय मिळवला आहे.
भाजपचा विजयाचा चौकार, की मविआचा सुपडा साफ
पूर्व नागपूर कधीकाळी काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र 2009 साली या मतदारसंघात भाजपच्या कृष्णा खोपडे यांनी सुरुंग लावला, तसेच सलग विजयाची हैट्रिक देखील लगावली. मात्र यंदा या मतदारसंघातून भाजपने नवीन चेहरा द्यावा, असा एक सुर पुढे आला होता. मात्र भाजपने ही मागणी डावलून खोपडे यांनाच परत एकदा संधी दिली. भाजप प्रमाणे काँग्रेसमध्ये देखील हा मतदारसंघावर दावा होता, त्यासाठी खूप प्रयत्न देखील झाले. मात्र अखेरच्या क्षणी येथून शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांना तिकीट देत मैदानात उतरवले. यामुळे नाराज झालेले गेल्यावेळचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी बंडखोरी करीत अपक्ष आव्हान दिले, तर अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी खोपडे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आणि त्यांनी प्रचाराचे रान पेटविले आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षांच्या मुख्य लढतीत बंडखोर उमेदवारांचे देखील मोठे आव्हान असल्याचे चित्र होते. .
नागपूर पूर्व विधानसभा- 2014
कृष्णा खोपडे : भाजप (विजयी) १, ०३,९९२
पुरुषोत्तम हजारे : काँग्रेस - ७९,९७५
सागर लोखंडे : बसपा - ५,२८४
मंगलमूर्ती सोनकुसरे : वंचित - ४,३३८
नोटा - ३,४६०
नागपूर पूर्व विधानसभा- 2024
कृष्णा खोपडे : भाजप (विजयी) ९९,२३६
अभिजित वंजारी : काँग्रेस ५०,५२२
दिलीप रंगारी : बसपा १२,१६४
दुनेश्वर पेठे : राष्ट्रवादी ८,०६१
अजय दलाल : शिवसेना ७,४८१
नागपूर पूर्व लोकसभा 2024
नितीन गडकरी (महायुती) - 1,41, 313
विकास ठाकरे (महाविकास आघाडी) - 67, 942
हे ही वाचा