एक्स्प्लोर

अख्खं मोहिते पाटील घराणं एकत्रित भाजपसोबत, धवलसिंह मोहिते पाटलांचाही भाजपला पाठिंबा

प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या काळात सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून उभी केलेली फळी धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मागे आहे.

अकलूज : मोहिते पाटील घराण्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर लगेच राष्ट्रवादीच्या जवळ गेलेले त्यांचे कट्टर विरोधक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी अखेर  आपला पाठिंबा भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर यांना जाहीर केला आहे. यामुळे माढा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्व मोहिते पाटील परिवार एकत्रित भाजपच्या मागे उभा राहिल्याचे चित्र आहे. डॉ. धवलसिंह हे प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब विजयसिंह मोहिते कुटुंबाच्या विरोधात काम करीत होते. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या काळात सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून उभी केलेली फळी धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मागे आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या दिवशीच धवलसिंह यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. यानंतर गेल्या आठवड्यात सांगोला येथे शरद पवार आले असता पुन्हा धवलसिंह यांची दुसरी बैठक झाली होती. मात्र काल रात्री माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. या दोन मोहिते कुटुंबात गेल्या 25 वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. पहिल्यांदाच ही दोन्ही कुटुंबं माढा लोकसभेसाठी भाजपच्या मागे उभी आहेत. धवलसिंह यांच्या भाजपाला पाठिंबा देण्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होणार आहे. राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी संजय शिंदे मैदानात आहेत तर भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर निवडणूक लढवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget