Dharashiv Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे. याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहारच्या बच्चू कडूंची तिसरी आघाडी देखली निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी काटे की टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे. 


धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार कैलास पाटील यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघात ठाकरेंकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अर्चना पाटील यांना मैदानात उतरवले होते. या लढतीत अर्चना पाटील यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना यश मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे. ओमराजे निंबाळकर फक्त कळंब धाराशिवचं नाही तर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात प्रचार करताना दिसत आहेत. 


महाराष्ट्र गुवाहाटीला जात सेनेच्या आमदारांनी बंड केलं. त्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं. दरम्यान, या बंडावेळी कैलास पाटील निम्म्या रस्त्यातून परतले होते. यामध्ये बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा देखील समावेश होता. त्यामुळे कैलास पाटील यांनी मतदारसंघात उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्याचे वातावरण तयार केले आहे. 


गेल्यावेळी तुळजापूरमधून भाजपाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आव्हान देण्यासाठी पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून मकरंद राजेनिंबाळकर यांच्या तिकीट दिली जाईल, असं बोललं जात होतं. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मर्जीतील कैलास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. यामध्ये कैलास पाटील यांनी बाजी मारली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Eknath Shinde : ठोक डालेंगे, बटण.. बटण.. इतकं ठोकणार की समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल, एकनाथ शिंदेंचं आक्रमक भाषण


Uddhav Thackeray : लोकसभेला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा म्हणाले, आता संजय राठोडला मांडीवर घेतील; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल