Dharashiv loksabha Election Result 2024 : धाराशीव लोकसभा मतदारसंघातून (Dharashiv loksabha Election) एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी 1 लाख 46 हजार मतांची आघाडी घेतली आहे. ते विजयाच्या वाटेवर आहेत. त्यामुळं हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांना मोठा धक्का आहे. स्वतःच्या गावातच अर्चना पाटील या 438 मतांनी पिछाडीवर आहेत. ओमराजे निंबाळकरांनी अर्चना पाटील यांना मोठा धक्का दिला आहे.

  


पाटील परिवाराला ओमराजे निंबाळकरांचा जोरदार धक्का 


धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांच्यासह पाटील परिवाराला ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार धक्का दिला आहे. दीड लाखांच्या जवळपासचं लीड ओमराजे निंबाळकरांना मिळालं आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांची स्वतःच्या गावात 438 मतांची पिछाडी आहे. ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांच्या तेर या गावात आघाडी घेतली आहे. दरम्यान, सध्या ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाची औपचारीकता बाकी आहे. 


महत्वाच्या बातम्या:


ओमराजे निंबाळकरांची विजयाच्या दिशेनं वाटचाल,1 लाखाहून अधिक मताधिक्य, अर्चना पाटलांना धक्का बसण्याची शक्यता