पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha  Election Counitng) मतमोजणीची प्रक्रिया सर्वत्र सुरु आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या (Maharashtra Lok Sabha Seat) 48 जागा आहेत. या जागांवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (MVA) कांटे की टक्कर आहे. पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या 10 जागा आहेत. या जागांवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सकाळी 10 वाजेपर्यंतच्या मतमोजणीतील कलानुसार महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आघाडीवर आहेत. कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती महाराज (Shahu Maharaj) आघाडीवर आहेत. शिरुरमध्ये अमोल कोल्हे (Amol Kolhe) आघाडीवर आहेत तर  पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. 


कोल्हापूरमध्ये कोण आघाडीवर? 


कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या शाहू छत्रपती यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यावर आघाडी मिळवली आहे. पहिल्या फेरीपासून शाहू महाराज छत्रपती यांनी आघाडी मिळवलेली आहे. 


सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. विशाल पाटील यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना पिछाडीवर टाकलं आहे. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील 30 हजार मतांनी आघाडीवर आहे. 


हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील आघाडीवर आहेत. ठाकरेंच्या उमेदवारानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर आघाडी मिळवली आहे. तर, राजू शेट्टी देखील या लोकसभा  मतदारसंघात पिछाडीवर आहेत. 


साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे शशिकांत शिंदे तिसऱ्या फेरीअखेर आघाडीवर होते. भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले पिछाडीवर होते. 


सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या देखील आघाडीवर आहेत. इथं देखील राम सातपुते यांच्यावर प्रणिती शिंदे यांनी आघाडी मिळवली आहे.


माढा लोकसभा निवडणुकीची लढत सर्वत्र चर्चेत होती. इथं भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टीचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. ही जागा कोण मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर आघाडी घेतलेली आहे. सुप्रिया सुळे यांची आघाडी कमी झाली असून सुनेत्रा पवार या देखील त्यांना कडवी लढत देत आहेत. 
 
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर पिछाडीवर आहेत.


शिरुर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव आढळराव यांच्यावर आघाडी घेतली आहे. 


मावळ लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत. मावळमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्यावर आघाडी मिळवली आहे. 


संबंधित बातम्या :