एक्स्प्लोर

महाराष्ट्रात मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा सुरु असताना देवेंद्र फडणवीसांचं ट्विट; नरेंद्र मोदींचे मानले आभार, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सस्पेन्स वाढत असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सर्वांच्याच मनात असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळताना दिसतंय. कारण महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालंय. मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जो काही निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल, असं एकनाथ शिंदेंनी काल पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून मौन बाळगून असलेल्या एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत अनेक अनुत्तरीत प्रश्नांना पूर्णविराम दिलाय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सस्पेन्स वाढत असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली असताना देवेंद्र फडणवीसांनी एक एक्सवर (आधीचे ट्विटर) एक पोस्ट केली आहे. यामध्ये महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला नवा वेग मिळाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात मंत्रिमंडळाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील रेल्वेच्या अंदाजे एकूण 7,927 कोटींच्या 3 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पांमुळे विकासाला चालना मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होईल. तसेच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील आणि तीर्थक्षेत्र यात्रेकरूंना याचा लाभ होईल. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. 

आज दिल्लीत फडणवीस, शिंदे, पवारांची अमित शाह यांच्यासोबत बैठक-

सत्तास्थापनेत शिवसेनेकडून कोणतीही आडकाठी नसेल असा निरोप एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून कळवला आहे. आज दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. 

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर-

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर बंगला या निवासस्थानबाहेर सदैव मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. मी देवंद्र सरिता गंगाधर फडणवीस महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री भावी वाटचालीस अश्या शुभेच्छा देण्यात आल्यात आहेत.

संबंधित बातमी:

विनोद तावडेंची एन्ट्री अन् महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत पुन्हा सस्पेन्स वाढला; बैठकीत सगळी गणितं मांडली, दिल्लीत हालचाली वाढल्या!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget