एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: राज ठाकरे तेव्हापासून आयडॉलॉजिकली आमच्यासोबत...; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा

Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'एकला चलो रे'चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले. 

Devendra Fadnavis On Raj Thackeray मुंबई: माझा पक्ष हा महायुतीबाहेरचा पक्ष आहे, पण मी कंम्फर्ट झोन कुठे पाहतो तर भाजपसोबत, असं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं. तसेच यंदाचा म्हणजेच 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे भाकीत देखील राज ठाकरेंनी एबीपी माझाशी बोलताना केलं होतं. राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये मनसेला स्थान देण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु राज ठाकरेंनी 'एकला चलो रे'चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले. 

राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट झाली. मात्र त्यानंतरही मनसे महायुतीत सहभागी झाल्याचे दिसले नाही. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महत्वाचं विधान केलं आहे. राज ठाकरे आमचे मित्र आहेत आणि जेव्हापासून त्यांनी हिंदुत्व स्विकारले आहे तेव्हापासून ते आयडॉलॉजिकली आमच्यासोबत आले आहे. आताच्या विधानसभेत राज ठाकरेंनी भाजपविरोधात 70 उमेदवार दिले आहेत. महायुतीमधे आम्ही आधीच तीन पक्ष आहोत...चौथ्याकरता स्पेस नाही...त्यामुळे ते लढतायत, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंना आम्ही कधीच प्रॉमिस केलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस

2022 साली जेव्हा शिवसेनेत बंड होऊन आम्ही शिंदेंसोबत गेलो पहिल्या दिवसापासून ठरलं होतं की आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार होतो. उद्धव ठाकरेंना आम्ही कधीच प्रॉमिस केलं नव्हतं की त्यांना मुख्यमंत्री करू...त्यांच्यासोबत 2019 साली जी युती तुटली ती आम्ही तोडली नाही. त्यांना सत्ता आणि मुख्यमंत्रीपद हवं होतं, म्हणून ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. मी पक्षाला हे सांगितलं की आपण सत्तेत सहभागी होऊयात नको, बाहेरून समर्थन करू अन्यथा लोकांना वाटेल की मी किती लालची आहे. मात्र शपथविधीच्या वेळी पक्षाने सांगितलं की सरकार हे सत्तेत सहभागी होऊन चालतं. बंडानंतर आलेलं हे सरकार अत्यंत नवीन आणि फ्राजाईल आहे. आपला पक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यांच्याविरोधात कोर्टात केसेस सुरू आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत जायला हवं. मी पक्षादेश मान्य केला आणि सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis: महायुतीने अमित ठाकरेंना पाठिंबा का दिला नाही?; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात सांगून टाकले!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: 'मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या', प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget