Devendra Fadnavis मुंबई: मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. 


भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आले आहे.  भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर आता विधिमंडळ पक्ष बैठकीत संमत होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. या बैठकीत निरीक्षक म्हणून इथे आलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन देखील उपस्थित होते.


आता भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची बैठक होणार-


भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आता भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची बैठक होणार आहे. या बैठकीत रणधीर सावरकर हे गटनेता निवड बैठकीत संचलन करतील. तर सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील हे प्रस्ताव मांडतील. रविंद्र चव्हाण हे प्रस्तावाला अनुमोदन देतील, अशी माहिती समोर आली आहे.


भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कोण कोण उपस्थित होते?


देवेंद्र फडणवीस
पंकजा मुंडे
मनिषा चौधरी
प्रविण दरेकर
पराग अळवणी
चंद्रकांत पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
अशोक चव्हाण
गिरिश महाजन
अतुल सावे
शिवेंद्रराजे भोसले
राहुल नार्वेकर 
चंद्रशेखर बावनकुळे
रविंद्र चव्हाण
सदाभाऊ खोत 
गोपिचंद पडळकर
विनोद तावडे


उद्या फक्त मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार?


उद्या (5 नोव्हेंबर) आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची महायुतीच्या सूत्रांची माहिती आहे. घटकपक्षांना मंत्र्यांच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्यावरच इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, आज महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटून, तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत.


महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)


महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288


महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 
अपक्ष- 2


भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष


जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)


भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137


देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत, VIDEO:



संबंधित बातमी:


Ajit Pawar: अजित पवार-अमित शाहांची भेट नाहीच, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर प्रश्नचिन्ह