मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024 Result) निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दरम्यान, निकालानंतर आता राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण? असं विचारलं जात आहे. त्यासाठी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपद शिंदे यांच्याकडेच राहावे, अशी मागणी केली आहे. तर भाजपाच्या नेत्यांनीही फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व सोपवले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. असे असतानाच आता शिंदे यांच्या पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रिपदाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.  

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत होणार? 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण याबाबत विचारण्यात आले. यावर बोलताना 25 नोव्हेंबर रोजी शपथ घ्यायला हवी. कारण सध्याच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंब रोजी संपणार आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबतचा अंतिम निर्णय हा दिल्लीत घेतला जाणार आहे. फडणवीस आणि शिंदे ही जोडी आहे. या जोडीने विधानसभा निवडणुकीत चमत्कार केला आहे, असं कौतुकही त्यांनी केलंय.

शपथविधी नेमका कुठे होणार?

यासह राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईतील वानखेडे मैदानावर शपथविधी होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क मैदान मिळवताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे शपथविधी वानखेडेवरच होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत. दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रिपद आमच्याकडेच राहावे असे वाटत आहे. त्यामुळे याबाबत नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

कोणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?

महायुती- 236मविआ- 49इतर- 3---------------------भाजपा- 132

शिवसेना (शिंदे गट)- 57

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41

काँग्रेस- 16

राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10

शिवसेना (ठाकरे गट)- 20

समाजवादी पार्टी- 2

जन सुराज्य शक्ती- 2

राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1

राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1

एमआयएम- 1 जागा

सीपीआय (एम)- 1

पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1

राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 

अपक्ष- 2

हेही वाचा :

निकालानंतर विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त, नाराजांना खूश करण्याची महायुतीला पुन्हा संधी; नेमकी कुणाला संधी मिळणार?

Vidarbha Vidhansabha Winner List 2024 : नागपूरसह विदर्भातील सर्व विजयी उमेदवारांची यादी; कोण उधळणार गुलाल? जाणून घ्या सविस्तर निकाल एका क्लिकवर

Congress All Winning Candidates List : काँग्रेसच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर...