Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Assembly Election 2024 Result Maharashtra) जाहीर झाला. महायुतीनं (Mahayuti) यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha) निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवलं. तर महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aaghadi) दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यामध्ये काँग्रेसचे विधीमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा समावेश आहे. 


पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपाच्या अतुल भोसले यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. तर, संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांना भाजपच्या अतुल खताळ यांनी हरवलं. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास काँग्रेसकडून हे दोन नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चालू होती. मात्र, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. 


महाराष्ट्रातील जाएंट किलर्स 



  • बाळासाहेब थोरांताना हरवणारे शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ (संगमनेर विधानसभा मतदारसंघ)

  • पृथ्वीराज चव्हाणांना हरवणारे भाजपचे अतुल भोसले (कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ)

  • यशोमती ठाकूरांना हरवणारे भाजपचे राजेश वानखेडे (तिवसा विधानसभा मतदारसंघ)

  • सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंना हरवणारे शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत (माहीम विधानसभा मतदारसंघ)

  • राजेश टोपेंना हरवणारे शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उधाण (घनसावंगी विधानसभा मतदारसंघ)

  • बच्चू कडूंना हरवणारे भाजपचे अमोल तायडे (अचलपूर विधानसभा मतदारसंघ)

  • हितेंद्र ठाकूरांना हरवणाऱ्या भाजपच्या स्नेहा दुबे (वसई विधानसभा मतदारसंघ)

  • धीरज देशमुखांना हरवणारे भाजपचे रमेश कराड (लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ)


दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे.  भाजपला आतापर्यंतचं मोठं यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला 50 चा आकडा गाठणंही मुश्कील झाल्याचं पाहायला मिळालं. तर महायुतीने 236 जागा जिंकल्या. विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळतेय. 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार असल्याचं समजतंय.


कोणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?



  • महायुती : 236

  • मविआ : 49

  • इतर : 3


पक्षनिहाय कुणाच्या पारड्यात किती जागा?



  • भाजपा : 132

  • शिवसेना (शिंदे गट) : 57

  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 41

  • काँग्रेस : 16

  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) : 10

  • शिवसेना (ठाकरे गट) : 20

  • समाजवादी पार्टी : 2

  • जन सुराज्य शक्ती : 2

  • राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी : 1

  • राष्ट्रीय समाज पक्ष- रासप : 1

  • एमआयएम : 1 जागा

  • सीपीआय (एम) : 1

  • पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया - पीडब्ल्यूपीआय : 1

  • राजर्षी शाहू विकास आघाडी : 1 

  • अपक्ष : 2


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...