Vidarbha Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Vidhan Sabha Election 2024) आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. तर सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यानं अनुभवलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर राज्यातील मतदार राजानं कुणाच्या पदरात मतांचं दान टाकलं? हे आज स्पष्ट होणार आहे. राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती सोपवणार? याचा फैसला आज होणार आहे. अशातच, विदर्भातील अनेक दिग्गज नेत्यांच्या लढतीत कोणत्या मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

असे असले तरी विदर्भातील मतदारराजा ज्या पक्षाला निवडणुकीत पाठिंबा देता, तो पक्ष राज्यात सत्तेच्या सिंहासनी विराजमान होतो, असं राजकीय गणित असल्याचा एक समज आहे. दरम्यान,  विधानसभेच्या जागांच्या या प्रदेशात काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमधील मुख्य लढती एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्ष विदर्भावर वर्चस्व राखण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे बघायला मिळाले आहे. याच अनुषंगाने महायुती आणि मविआमध्ये विदर्भाच्या जागेवरून घमासान झाल्याचे बघायला मिळाले होते. ऐकुणात विदर्भ हा राज्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून आहे. त्यामुळे राज्यात सत्तेची किल्ली महायुतीकडे जाईल, की महाविकास आघाडीकडे, याचा निर्णय राज्यातील 158 मतदारसंघ करणार असल्याचे चिन्ह आहे.
 
दरम्यान, राज्यातील 158 मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे. त्यामुळे 158 मतदारसंघाचा कौल भाजप सरस की काँग्रेस, खरी शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची, ओरिजनल राष्ट्रवादी दादांची की साहेबांची? हे बघणेही आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

(Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.)

नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
 1  नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा देवेंद्र फडणवीस (भाजप) प्रफुल्ल गुडधे(काँग्रेस)    देवेंद्र फडणवीस (भाजप)
2 नागपूर दक्षिण विधानसभा  मोहन मते (भाजप) गिरीश पांडव (काँग्रेस) अनुप दुरुगकर (मनसे) मोहन मते (भाजप)
नागपूर पूर्व विधानसभा   कृष्णा खोपडे (भाजप) दुनेश्वर पेठे (NCP-SP) आभा पांडे (अपक्ष) कृष्णा खोपडे (भाजप)
नागपूर मध्य विधानसभा प्रविण दटके (भाजप) बंटी शेळके (काँग्रेस) रमेश पुणेकर (अपक्ष) प्रविण दटके (भाजप)
नागपूर पश्चिम विधानसभा  सुधाकर कोहळे (भाजप) विकास ठाकरे(काँग्रेस) प्रकाश गजभिये (बसपा) विकास ठाकरे (काँग्रेस)
नागपूर उत्तर विधानसभा  डॉ. मिलिंद माने (भाजप) डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)  मनोज सांगोळे (बसपा) डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
 काटोल विधानसभा चरणसिंग ठाकूर (भाजप) सलील देशमुख (NCP-SP) अनिल देशमुख (NCP-AP) चरणसिंग ठाकूर (भाजप)
कामठी विधानसभा चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)  सुरेश भोयर (काँग्रेस) विक्रांत मेश्राम (बसपा)  चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
उमरेड विधानसभा सुधीर पारवे (भाजप) संजय मेश्राम (काँग्रेस) प्रमोद घरडे (अपक्ष) संजय मेश्राम (काँग्रेस)
10  सावनेर विधानसभा डॉ. आशिष देशमुख (भाजप) अनुजा सुनील केदार (काँग्रेस) घनश्याम निखाडे (मनसे) डॉ. आशिष देशमुख (भाजप)
11  हिंगणा विधानसभा समीर मेघे (भाजपा)   रमेशचंद बंग (NCP-SP) डॉ. देवेंद्र कैकाडे (बसपा) समीर मेघे (भाजप) 
12  रामटेक विधानसभा  आशिष जयस्वाल (शिंदेसेना) विशाल बरबटे (शिवसेना ठाकरे गट)  राजेंद्र मुळक (अपक्ष) आशिष जयस्वाल (शिंदेसेना)

विदर्भातील सर्व मतदारसंघातील उमेदवारांची यादी

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 तुमसर चरण वाघमारे (राष्ट्रवादी – एसपी) राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)   राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
भंडारा श्रीमती पूजा ठावकर (काँग्रेस) नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)   नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)
3   साकोली नानाभाऊ पटोले (काँग्रेस) अविनाश ब्राह्मणकर (भाजप)   नानाभाऊ पटोले (काँग्रेस)
4   अ. मोरगाव दिलीप बनसोड (काँग्रेस) राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस)   राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
तिरोरा रविकांत बोपचे (राष्ट्रवादी – एसपी) विजय रहांगडाले (भाजप)   विजय रहांगडाले (भाजप)
गोंदिया गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) विनोद अग्रवाल (भाजप)   विनोद अग्रवाल (भाजप)
आमगाव राजकुमार पुरम (काँग्रेस) संजय पुरम (भाजप)   संजय पुरम (भाजप)
आरमोरी रामदास मेश्राम (काँग्रेस) कृष्णा गजबे (भाजप)   रामदास मेश्राम (काँग्रेस)
गडचिरोली मनोहर पोरेटी (काँग्रेस) डॉ. मिलिंद नरोटे (भाजप)   मनोहर पोरेटी (काँग्रेस)
10  अहेरी भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी – एसपी) धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)   धर्मरावबाबा आत्राम
11  राजुरा सुभाष धोटे (काँग्रेस) देवराव भोंगळे (भाजप)   देवराव भोंगळे (भाजप) 
12  चंद्रपूर प्रवीण पाडवेकर (काँग्रेस) किशोर जोरगेवार (भाजप)   किशोर जोरगेवार (भाजप)
13  बल्लारपूर संतोषसिंग रावत (काँग्रेस) सुधीर मुनगंटीवार (भाजप)   सुधीर मुनगंटीवार (भाजप)
14  ब्रह्मपूरी विजय वडेट्टीवार (काँग्रेस) कृष्णालाल सहारे (भाजप)   विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
15  चिमुर सतीश वारजूकर (काँग्रेस) बंटी भांगडिया (भाजप)   बंटी भांगडिया (भाजप)
16 वरोरा प्रवीण काकडे (काँग्रेस) करण देवतळे (भाजप)   करण देवतळे (भाजप)
17  वणी संजय दरेकर (शिवसेना – यूबीटी) संजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप)   संजय दरेकर (शिवसेना – यूबीटी)
18  राळेगाव वसंत पुरके (काँग्रेस) डॉ. अशोक उइके (भाजप)   डॉ. अशोक उइके (भाजप)
19  यवतमाळ अनिल मंगूळकर (काँग्रेस) मदन येरावार (भाजप)   अनिल मंगूळकर (काँग्रेस)
20  दिग्रस पवन जयस्वाल (शिवसेना- यूबीटी) संजय राठोड (शिवसेना)   पवन जयस्वाल (शिवसेना- यूबीटी)
21  आर्णी जितेंद्र मोघे (काँग्रेस) राजू तोडसाम (भाजप)   राजू तोडसाम (भाजप)
22  पुसद शरद मैंद (राष्ट्रवादी – एसपी) इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)   इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
23  अकोट महेश गंगणे (काँग्रेस) प्रकाश भारसाकळे (भाजप)   प्रकाश भारसाकळे (भाजप)
24  बाळापूर नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी) बळिराम शिरसकर (शिवसेना)   नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी)
25  अकोला पश्चिम साजिद खान मन्नन खान (काँग्रेस) विजय अग्रवाल (भाजप)   साजिद खान मन्नन खान (काँग्रेस)
26  अकोला पूर्व गोपाल दातकर (शिवसेना- यूबीटी) रणधीर सावरकर (भाजप)   रणधीर सावरकर (भाजप)
27  मूर्तिझापूर सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी – एसपी) हरिश पिंपळे (भाजप)   हरिश पिंपळे (भाजप)
28 रिसोड अमित झनक (काँग्रेस) भावना गवळी (शिवसेना)   अमित झनक (काँग्रेस)
30  वाशिम डॉ. सिद्धार्थ देवळे (शिवसेना- यूबीटी) श्याम खोडे (भाजप)   श्याम खोडे (भाजप)
31  कारंजा ज्ञायक पटनी (राष्ट्रवादी – एसपी) सई डहाके (भाजप)   सई डहाके (भाजप)
32  धामणगाव रेल्वे वीरेन्द्र जगताप (काँग्रेस) प्रताप अडसड (भाजप)   प्रताप अडसड (भाजप)
33  बडनेरा सुनील खराटे (शिवसेना- यूबीटी) रवी राणा (महायुती पुरस्कृत)   रवी राणा (महायुती पुरस्कृत)
34  अमरावती डॉ. सुनील देशमुख (काँग्रेस) सुलभा खोडके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)   सुलभा खोडके
35  तिवसा यशोमती ठाकूर (काँग्रेस) राजेश वानखेडे (भाजप)   राजेश वानखेडे (भाजप)
36  दर्यापूर गजानन लवटे (शिवसेना – यूबीटी) अभिजीत अडसूळ (शिवसेना)   गजानन लवटे (शिवसेना – यूबीटी)
37  मेळघाट डॉ. हेमंत चिमोटे (काँग्रेस) केवलराम काळे (भाजप)   केवलराम काळे (भाजप)
38  अचलपूर बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस) प्रवीण तायडे (भाजप) बच्चू कडू (प्रहार) प्रवीण तायडे
39  मोर्शी गिरीश कराळे (राष्ट्रवादी – एसपी) उमेश यावलकर (भाजप) देवेंद्र भुयार (एनसीपी) उमेश यावलकर (भाजप)
41  आर्वी मयूरा काळे (राष्ट्रवादी – एसपी) सुमित वानखेडे (भाजप)   सुमित वानखेडे (भाजप)
42  देवळी रणजीत कांबळे (काँग्रेस) राजेश बकाने (भाजप)   राजेश बकाने (भाजप)
43  हिंघणघाट अतुल वांदिले (राष्ट्रवादी – एसपी) समीर कुणावार (भाजप)   समीर कुणावार (भाजप)
44  वर्धा शेखर शेंडे (काँग्रेस) डॉ. पंकज भोयर (भाजप)   डॉ. पंकज भोयर (भाजप)
45  बुलढाणा संजय गायकवाड (शिवसेना शिंदे) जयश्री शेळके (शिवसेना ठाकरे)   संजय गायकवाड (शिवसेना शिंदे)  
46  जळगाव जामोद  संजय कुटे (भाजपा) स्वाती वाकेकर (काँग्रेस)  प्रवीण पाटील (वंचित) संजय कुटे (भाजप)
47  खामगाव  आकाश फुंडकर (भाजपा दिलीप सानंदा (काँग्रेस)   आकाश फुंडकर (भाजप)
48  चिखली  श्वेता महाले (भाजपा) राहुल बोंद्रे (काँग्रेस)   श्वेता महाले (भाजपा)
49  मेहकर  संजय रायमुलकर (शिवसेना शिंदे) सिद्धार्थ खरात (शिवसेना ठाकरे) डॉ. ऋतुजा चव्हाण (वंचित) सिद्धार्थ खरात (शिवसेना ठाकरे)
51  मलकापूर  चैनसुख संचेती (भाजपा) राजेश एकडे (काँग्रेस) 

 

चैनसुख संचेती (भाजपा)
50  सिंदखेडराजा  शशिकांत खेडेकर (शिवसेना शिंदे)   डॉ.राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी शरद पवार)

मनोज कायंदे (अपक्ष)

गायत्री शिंगणे (अपक्ष)

मनोज कायंदे (अपक्ष)

विदर्भातील संपूर्ण 62 मतदारसंघाचा निकाल

१) चंद्रपूर - भाजप 5, काँग्रेस-1

2 )गडचिरोली -
भाजप -1
काँग्रेस -1
अजित पवार -1

3) अमरावती - 
भाजप 5, 
 युवा स्वाभिमान 1, अजित पवार 1, ठाकरे गट -1

4) यवतमाळ- 
भाजप - 3,
कॅाग्रेस 1, 
अजित पवार - 1, 
शिंदे - 1 
ठाकरेंची शिवसेना - 1 
 
5) गोंदिया - 
भाजप 3,
अजित पवार -1

6) भंडारा - 
भाजपा -1, 
शिंदे सेना १, 
अजित पवार १ 

7) अकोला - 
भाजप -3 
काँग्रेस -1
उद्धव ठाकरे -1

8) वर्धा - 
भाजप 4, 
कॅाग्रेस 0


9) बुलडाणा-  
भाजप 4, 
अजित पवार 1
 शिंदे 1,
उद्धव ठाकरे 1

10) नागपुर जिल्हा 
भाजप - 8
काँग्रेस - 3
शिंदे गट - 1


११) वाशिम 
भाजप 2
काँग्रेस -1

 

१)भाजपा- 39
२)शिवसेना शिंदे-4
३)राष्ट्रवादी अजित पवार -6
४)काँग्रेस-8
५)शिवसेना युबिटी- 4
६)राष्ट्रवादी शरद पवार - 0
७)मनसे - 0
८)इतर -1( युवा स्वाभिमान )


महायुती - 50 ( युवा स्वाभिमान सह )
मविआ-12
इतर

हे ही वाचा