एक्स्प्लोर

हिंमत असेल तर निवडणूक लढवा, विश्वजीत कदमांचे प्रतीक पाटलांना आव्हान, काँग्रेसच्या युवा नेत्यांमध्ये वाद पेटला

जे नेते सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते ते आता कुठे आहेत? ते पळवाटा का काढत आहेत? असा सवाल करत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि इच्छुक उमेदवार प्रतीक पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

सांगली : जे नेते सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते ते आता कुठे आहेत? ते पळवाटा का काढत आहेत? असा सवाल करत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि इच्छुक उमेदवार प्रतीक पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर प्रतीक पाटलांनी निवडणूक लढवावी, असे आव्हान देत स्वतःच्या भावाने त्यांना निष्क्रिय ठरवले आहे, असा टोलाही विश्ववजीत कदमांनी लगावला आहे. कदम आज सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सांगली लोकसभेच्या जागेवरून गेल्या महिन्यापासून सांगली काँग्रेसमध्ये सुप्तसंघर्ष सुरू आहे. वसंतदादा पाटील घराणे विरोधात पतंगराव कदम घराण्यातला हा संघर्ष आज उफाळून आला. काँग्रेस आमदार व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांनी वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्यावर सांगली लोकसभा उमेदवारी नाकारल्यावरुन निशाणा साधला आहे. लोकसभेसाठी इच्छुक असणारे आज कुठे आहेत? ते आता पळवाट का काढत आहेत? असा सवाल आमदार विश्वजीत कदम यांनी उपस्थित केला आहे. सांगलीत विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्या भूमिकेवरही टीका केली आहे. विश्वजीत कदम म्हणाले की, "गेली 35 वर्ष ज्यांच्या घरात सांगलीची खासदारकी होती, ते आता तिकीट घेण्यापासून लांब का पळत आहेत? लोकसभेचे तिकीट आपल्या घरातच राहावे यासाठी या लोकांनी काय प्रयत्न केले? असा सवाल उपस्थित करत विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. संबधित बातमी :  सांगलीची जागा स्वाभिमानीला दिल्यास पक्ष कार्यालयाला टाळे ठोकू, काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींना दणका कदम म्हणाले की, "आम्हाला लोकसभेचे तिकीट मिळले नाही, तर दुसऱ्या कोणालाच ते मिळू नये, ही विशाल पाटलांची भूमिका योग्य नाही. सांगली लोकसभेची काँग्रेसची जागा कोणत्याही पक्षाला जाणार नाही, ही जागा काँग्रेसकडेच राहील यासाठी आमचा प्रयत्न राहील. हायकामांड जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील, असेही कदम यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानीला द्यायची की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु खासदार राजू शेट्टींसोबत आघाडी करून ही निवडणूक लढणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget