एक्स्प्लोर

निवडणुकांमध्येच 'तहलका', काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर?

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतंच स्वपक्षावर घणाघाती टीका केली होती. आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अभय दिल्यामुळे चतुर्वेदींनी संताप व्यक्त केला होता.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत. त्यातच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदीही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाल्यानंतरही काँग्रेसमधील नाराजांचं आऊटगोईंग सुरुच आहे. त्यातच काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील  प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदीही पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतंच काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अभय दिल्यामुळे चतुर्वेदींनी संताप व्यक्त केला होता. ट्विटरवरुनही चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली होती. प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रियांका चतुर्वेदी हा काँग्रेसचा राष्ट्रीय चेहरा असल्यामुळे पक्षाला मोठा हादरा बसू शकतो. कोण आहेत प्रियांका चतुर्वेदी? प्रियांका चतुर्वेदी यांनी डीएनए, तेहलका, फर्स्टपोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. बाल शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्य यासारख्या विषयांवर त्या कार्यरत आहेत. पुस्तकांची समीक्षा करणारा चतुर्वेदींचा ब्लॉग हा देशभरातील टॉप टेन वेबब्लॉग्जपैकी एक मानला जातो. मे 2013 मध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची काँग्रेस प्रवक्त्या म्हणून निवड झाली. सोशल मीडिया, वृत्तवाहिन्यांवर काँग्रेस पक्षाची बाजू हिरीरीने मांडण्यात त्या अग्रेसर असतात. रणदीप सुरजेवालांच्या नेतृत्वातील 'कम्युनिकेशन विभागा'च्या त्या सदस्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
Raksha Bandhan: सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन

व्हिडीओ

Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha
Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
Raksha Bandhan: सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
Embed widget