एक्स्प्लोर

4 तारखेपर्यंत काँग्रेसनं उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेसचा राजकीय बॉम्ब फोडणार, आडम मास्तरांचा इशारा

काँग्रेसने सोलापूर मध्यची (Solapur Central ) उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा 5 नोव्हेंबरला काँग्रेसबाबतचा राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी दिला.

Narsayya Adam on Congress : काँग्रेसने सोलापूर मध्यची (Solapur Central Assembly Election) उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा 5 नोव्हेंबरला काँग्रेसबाबतचा राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी दिला आहे. काँग्रेसने 4 तारखेपर्यंत आपल्या उमेदवाराचा अर्ज माघार घ्यावा अशी विनंती आडम यांनी केली आहे. अन्यथा काँग्रेसनं केलेलं सगळं षडयंत्र उघड करणार असल्याचा इशारा आडम यांनी दिला. त्यामुळं आता काँग्रेस काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

माकपचे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांची भेट घेणार

सोलापूर मध्यची जागा महाविकास आघाडीतून माकपला सोडण्यात येणार होती, मात्र काँग्रेसने स्वतःचा उमेदवार इथे जाहीर केला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष चेनत नरोटेंना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. या संदर्भात उद्या माकपचे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात विनंती करणार आहे.  जर 4 तारखेपर्यंत काँग्रेसच्या उमेदवाराचे अर्ज माघार घेतलं नाही तर काँग्रेसने केलेलं सगळे षडयंत्र उघड करणार असल्याचं आडम यांनी सांगितल.  

माणसं ओळखता आली नसती तर 50 वर्ष राजकारणात राहिलो असतो का? 

देवेंद्र फडणवीस हा मोठा माणूस आहेत. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही राहिलेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? असे नरसय्या आडम म्हणाले. मला जरं माणसं ओळखता आली नसती तर 50 वर्ष राजकारणात राहिलो असतो का? असे म्हणत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिउत्तर दिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडम मास्तर यांना माणसं ओळखता आली नाही अशा पद्धतीची टीका केली होती. दरम्यान ‘मी काँग्रेसला ओळखण्यात ही कुठेही कमी पडलो नाही, सुशीलकुमार मुख्यमंत्री असतानाही काँग्रेसने आम्हाला जागा सोडली होती’ असे आडम यावेळी म्हणाले.  

काँग्रेसला पाच तारखेपर्यंतचे अल्टीमेटम

आता नेमकं काय झालाय याचा खुलासा मी पाच तारखेला करणार आहे. त्याआधी आम्ही सोनिया गांधींची भेट घेऊन काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे आडम म्हणाले.  सोलापूर मध्य विधानसभेची जागा महाविकास आघाडीने माकपला न सोडता काँग्रेसचा उमेदवार दिला आहे. त्यावरून माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेसला पाच तारखेपर्यंतचे अल्टीमेटम दिला आहे. काँग्रेसनं उमेदवार मागे घेण्याची मागणी आडम यांनी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग, आडम मास्तरांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट, शहर मध्यची जागा माकपला मिळणार? 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget