एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या लोकसभा जागांसाठी काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठका, काही उमेदवार निश्चित

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीच्या दोन बैठका पार पडल्या. या बैठकीनंतर नागपूरमधून नाना पटोले निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीच्या दोन बैठका पार पडल्या. या बैठकीनंतर नागपूरमधून नाना पटोले निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, रामटेकमधून मुकुल वासनिक, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, नांदेडमधून अमिता चव्हाण यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विखे पाटलांचा मुलगा सुजयच्या उमेदवारीचा फैसला न झाल्यामुळे विखे पाटलांनी बैठकीला दांडी मारल्याचे बोलले जात आहे. परंतु विखेंच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे नुकतेच ऑपरेशन झाल्यामुळे ते आले नाहीत, असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले आहे. बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते नाना पटोले उपस्थित होते. आजच्या बैठकीनंतर नाना पटोले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरींच्या विरोधात नागपूरमधून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. 11 मार्च रोजी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर गुजरात आणि उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातल्या उमेदवारांची काही नावे घोषित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांनी लोकसभेच्या मैदानात स्वतः उतरावे अशी काँग्रेस हायकमांडची इच्छा आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मर्जीविरोधात निवडणूक लढवावी लागू शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Shivsena Assembly Election List : शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 नावं, आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivsena Eknath Shinde List : शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी समोर, विद्यमान आमदारांना पुन्हा संधीMuddyach Bola : कल्याण-डोंबिवलीत कुणाची हवा? अभिनेता Pandharinath Kamble सोबत मुद्याचं बोलाZero Hour : मविआ-महायुतीच्या जागावाटपाचा गोंधळ ते पुण्यात सापडलेले 5 कोटी,सविस्तर चर्चाZero Hour : ब्रिक्सची परिषदेत भेट, पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Shivsena Assembly Election List : शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 नावं, आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?;  विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?; विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Umesh Patil :  यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
राजन पाटील यांचे 'ते' वक्तव्य, छत्रपती शिवरायांचा दाखला, सुनील तटकरेंना सवाल, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात काय?
Embed widget