एक्स्प्लोर

सांगलीची जागा स्वाभिमानीला दिल्यास पक्ष कार्यालयाला टाळे ठोकू, काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींना दणका

काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी पक्षाला सोडणार असल्याच्या चर्चेने संतप्त स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज सकाळी काँग्रेस समितीसमोर मोठी गर्दी केली होती.

सांगली : काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी पक्षाला सोडणार असल्याच्या चर्चेने संतप्त स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज सकाळी काँग्रेस समितीसमोर मोठी गर्दी केली होती. सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडली तर पक्ष कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. दरम्यान, सांगली लोकसभेची जागा अन्य पक्षांसाठी सोडली जाण्याच्या चर्चेने अस्वस्थ झालेल्या स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी थेट पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांना साकडे घातले आहे. सांगलीची जागा अन्य कोणालाही देऊ नये, अशी गळ त्यांनी खर्गेंना घातली आहे. यावर पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडे आहे. परंतु या निवडणुकीत सांगलीची जागा ही अन्य पक्षाला देण्याची तयारी काँग्रेस पक्षश्रेष्टींकडून सुरू आहे. त्यामुळे सांगलीतले काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावन्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी याचा निषेध केला आहे. पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयाविरोधात सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून काँग्रेस हाय कमांडचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. यावेळी घोषणाबाजी करत काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीसमोर घोषणाबाजी केली. सांगलीच्या जागेवर कॉंग्रेसचाच अधिकार असल्याच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या. हाय कमांडने आपला निर्णय बदलावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगलीची जागा इतर कोणत्याही पक्षाला देणे हा वसंतदादा पाटील यांचे घराणे संपवण्याचा कुटील डाव असल्याचा आरोपही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!

Embed widget