एक्स्प्लोर

विधानसभेसाठी उर्मिला मातोंडकरांची काँग्रेसला आठवण, उमेदवारांच्या प्रचाराला येण्याचं साकडं

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबई शहर काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप तिने यापूर्वीच केला होता. त्यामुळे आता उर्मिला पुन्हा काँग्रेसच्या स्टेजवर दिसणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून रामराम ठोकणाऱ्या उर्मिला मातोंडकरांची पुन्हा काँग्रेला आठवण झाली आहे. उर्मिला मातोंडकरांनी विधानसभेच्या प्रचाराला यावं यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी स्वत: उर्मिला मातोंडकरांशी संपर्क साधला आहे. त्यांनी मातोंडकरांना विधानसभाच्या प्रचाराला येण्याची गळ घातली आहे. यासदंर्भात दोन दिवसांत उर्मिला मातोंडकर आपला निर्णय कळवणार असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबई शहर काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप तिने यापूर्वीच केला होता. त्यामुळे आता उर्मिला पुन्हा काँग्रेसच्या स्टेजवर दिसणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. Congress | काँग्रेसला उर्मिला मातोंडकरांची आठवण, विधानसभेच्या प्रचाराला येण्यासाठी साकडं | ABP Majha अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा पक्षांतर्गत गट-तट आणि राजकारण यांना कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं उर्मिला त्यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटलं होतं. उर्मिला मातोंडकरने या वर्षी 27 मार्च रोजी नवी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपल्या पक्षप्रवेशादरम्यान तिने तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेटही घेतली होती. आपण काँग्रेसच्या विचारधारेला मानतो आणि फक्त निवडणुकीपुरता पक्षात आलेलो नाही, असंही तिनं पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. परंतु सहा महिन्याच्या आतच पक्षातील गटबाजीला कंटाळून तिने काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला होता. "16 मे रोजी लिहिलेल्या पत्रावर कारवाई झाली नाही. ज्यांच्याविरोधात तक्रारी केल्या, त्यांना पदं मिळाली. कोणी मला वापरु नये, यासाठी पक्षाचा राजीनामा देत आहे," असं तिने प्रसिद्धी पत्रात म्हटलं होतं. तसंच लोकांसाठी काम करत राहणार असल्याचंही स्पष्ट केलं. मुंबई काँग्रेससाठी मोठ्या उद्दिष्टांकरता काम करण्याऐवजी पक्षातल्या अंतर्गत स्वार्थी प्रवृत्ती आणि त्यांच्यातल्या लढायांसाठी माझा वापर करु देणं माझ्या राजकीय आणि सामाजिक जाणीवांना मान्य नाही," असंही उर्मिलाने निवेदनात म्हटलं होतं. उर्मिलाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याशी लढत दिली होती. बॉलिवूड सेलेब्रिटी, उत्तम वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व असूनही उर्मिलाला गोपाळ शेट्टींना मात्र मात देता आली नाही. शेट्टींना 7 लाख 6 हजार तर उर्मिलाला 2 लाख 41 हजार मतं मिळाली होती.
संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Satara : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नावाचा घोळ, प्रशांत बोंबले यांच्या नावाची नोंद 'दादा साहेबाची बॉम्बस्फोट'
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नावाचा घोळ, प्रशांत बोंबले यांच्या नावाची नोंद 'दादा साहेबाची बॉम्बस्फोट'
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Embed widget