एक्स्प्लोर

काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपमध्ये, राहुल शेवाळेंना पाठिंबा

दक्षिण मध्य मुंबईतून युतीचे उमेदवार राहुल शेवाळेच विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास कालिदास कोळंबकरांनी भाजपप्रवेशाच्या वेळी व्यक्त केला.

मुंबई : मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना कोळंबकरांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 'मी काँग्रेसवर नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं म्हणून मला पक्षाने बाहेर केलं' असं म्हणत कालिदास कोळंबकरांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. दक्षिण मध्य मुंबईतून युतीचे उमेदवार राहुल शेवाळेच विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वासही कोळंबकरांनी यावेळी व्यक्त केला. दक्षिण मध्य मुंबईतून आघाडीचे उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याकडून कोणताही संपर्क झालेला नाही, तर युतीचे उमेदवार असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आपल्या संपर्कात आहेत. त्यामुळे 'बॉस'च्या आदेशानंतर मी युतीचा प्रचार करणार, असा इशारा कालिदास कोळंबकरांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. भविष्यात ज्या पक्षात जाणार आहे, त्या पक्षाचे बॉस, असा उल्लेख करत कोळंबकरांनी मुख्यमंत्र्यांकडे अंगुलीनिर्देश केला होता. कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत. यापूर्वीच कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयांच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसले होते. दादरमधील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आपला इरादा जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपचा रस्ता धरला आहे. त्यामध्ये कोळंबकरांच्या रुपाने आणखी एकाची भर पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Politics : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपमध्ये गटबाजी? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्याचं स्फोटक विश्लेषण; पराभवामागचं राज'कारण' सांगितलं
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपमध्ये गटबाजी? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्याचं स्फोटक विश्लेषण; पराभवामागचं राज'कारण' सांगितलं
Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
Kisan Sangh on BJP : भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...

व्हिडीओ

India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
Embed widget