लखनौ : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Result 2024) धक्कादायक निकाल लागला आहे. एक्झिट पोलमध्ये यावेळीदेखील एनडीए (NDA) बहुमतात सत्ता स्थापन करणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण आता प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर देशात सध्यातरी वेगळे चित्र दिसत आहे. भाजपला (BJP) महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मोठा फटका बसला आहे. भाजपच्या अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत फटका बसला आहे. दरम्यान, एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे. त्यांनी वाराणसी येथून विजयी झेंडा फडकवला आहे. 


नरेंद्र मोदी विजयी होण्याची शक्यता 


नरेंद्र मोदी यांनी 2019 सालाप्रमाणे याही वर्षी वाराणसी या जागेवरून निवडणूक लढवली. मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने अजय राय यांना तिकीट दिले होते. नरेंद्र मोदी यांना एकूण 6 लाख 12 हजार 970 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार राय यांना 4 लाख 6 हजार 457 मते पडली आहेत. म्हणजेच काँग्रेसचे अजय राय यांचा 1 लाख 52 हजार 513 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे वाराणसी येथून मोदी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


उत्तर प्रदेशचा निकाल काय? (Uttar Pradesh Lok Sabha Election Result)


या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. 2019 साली या राज्यात भाजपने एकहाती वर्चस्व गाजवले होते. यावेळी मात्र भाजपच्या येथे अनेक जागा कमी झाल्या आहेत. सध्या भाजप 34 जागांवर तर समाजवादी पार्टी 35 जागांनी आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसदेखील सात जागांवर आघाडीवर आहे. आरएलडीचे दोन उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.  


2019 साली काय घडलं होतं? 


2019 साली भाजपने या राज्यात चांगली कामगिरी केली होती. येथे भाजपने एकूण 78 जागा लढवल्या होत्या. यापैकी भाजपचा 62 जागांवर विजय झाला होता. काँग्रेसने एकूण 67 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी फक्त एका जागेवर काँग्रेसला विजयी होता आलं होतं. म्हणजेच यावेळी भाजपच्या साधारण 30 पेक्षा अधिक जागा कमी होत आहेत.


हेही वाचा :


Sharad Pawar Calls Nitish Kumar : शरद पवारांचा नितीश कुमारांना फोन, मोदींना धक्का देण्याची तयारी


Lok Sabha Election Results 2024 : चारशेच्या नादात डाव अडीचशेत अडकला? NDAच्या विजयानंतरही आव्हानांचा डोंगर, नितिशकुमार 'किंगमेकर' होणार??


कर्नाटकमध्ये लोकसभेचा धक्कादायक निकाल! पाच वर्षांत सगळं बदललं; भाजपला मोठा धक्का