Balasaheb Thorat : महाराष्ट्रने देशमुखांचं वक्तव्य ऐकलं आहे. त्याच्यावर वेळीच कारवाई न करता जयश्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करतं आहे. महाराष्ट्रातील जनता या कृत्याचा निषेध करतील. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे बहि‍णीचे हे हाल करायचे. हे केवळ मतांकरिता केलेले कृत्य आहे. अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. 


विखेंना (Sujay Vikhe Patil) टार्गेट करायचं काहीच कारण नाही. वक्तव्य करताना विखे टाळ्या वाजवत होते. त्यांच्या पक्षातल्यांना हे आवडलं नाही. महाराष्ट्रातील पाच वर्षात राजकरणाची पातळी बदलली होती. मात्र कालच्या घटनेने याचा तळ गाठलेला आहे. माझी मुलगी आहे म्हणून वाईट वाटत नाही. तर समस्त महिला वर्गाला ही शिवी दिलेली आहे.निवडणूक आयोगाकडे कायदेशीर तक्रार करू. असा आक्रमक पवित्राही काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी घेतला आहे.  


तर कुठली जागा देण्यासंदर्भात विचार केला जाईल, मात्र.... 


मी तेढ असलेल्या जागेवर समन्वयक म्हणून जागांवर चर्चा करण्यासाठी अनुकूल वातावरण करतो. आम्ही कुठल्याही जागा सोडण्याचा निर्णय घेत नाहीत. सचिन सावंत हा तरुण कार्यकर्ता आहे. वैचारिक आहे.  मी त्यांना १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव दिलं होतं, म्हणून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. त्या जागे व्यतिरिक्त इतर कुठली जागा देण्यासंदर्भात विचार केला जाईल. असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. 


महाराष्ट्र सर्वात जास्त जीएसटी देणारं राज्य मुंबई आहे. मात्र परतावा त्या तुलनेत कमी मिळतो. हे सध्या सर्व काही गुजरात ठरवतंय. गुजरातवाले जे ठरवतात त्यापुढे महायुतीचे नेते मान डोलवण्याचे काम करतात. अशी टीका ही बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर केली आहे. वांद्रे येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी ते बोलत होते.    


महिलांच्या अब्रूला हात घातला गेलाय


आज अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेरमध्ये येत आहेत. गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी ते पोलिसांना निवेदन देणार आहेत. त्यानंतर ते निषेध सभा घेणार आहेत. याबाबत विचारले असता जयश्री थोरात म्हणाल्या की, ते महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं वागणं हे त्यांना शोधणारं नाही. त्यांनी उलट माझ्याकडे येऊन माझे सांत्वन करायला पाहिजे होते. मात्र ते गाड्या फोडल्या प्रकरणी निवेदन द्यायला येत आहेत. विषय बदलण्याची गरज नाही. तुम्ही गाड्या फोडल्याचे म्हणत आहात, इथे प्रत्येक महिलांच्या अब्रूला हात घातला गेलाय. महिला पेटून उठलेल्या आहेत. गाड्या येतात जातात, हा केवळ माझा अपमान नव्हता तर इथे असलेल्या प्रत्येक मातेचा अपमान करण्याचं काम करण्यात आले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 


आणखी वाचा


संगमनेरमधील हिंसक प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दखल, उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता, अजित पवारांकडूनही सुजय विखेंची कानउघडणी