Congress Candidate List Maharashtra : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसने कोल्हापुरातले दिवंगत नेते पीएन पाटील यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर केली आहे. पीएन पाटील यांचे लोकसभा निवडणुकीनंतर निधन झाले होते. पीएन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शेवटच्या श्वासापर्यंत लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांच्या प्रचारात उतरले होते. आता काँग्रेस पक्षाने पीएन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना करवीरमधून मैदानात उतरवलं आहे. 

अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात पप्पू उर्फ तिरुपती कदम कोंडेकर यांना उमेदवारी 

शंकरराव चव्हाण , अशोक चव्हाण यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. शिवाय काँग्रेसकडून अनेक सत्तापदं चव्हाण घराणेने उपभोगलं होतं. मात्र, वयाच्या 65 व्या वर्षी अशोक चव्हाण यांना काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती. आता त्यांची मुलगी श्रीजया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसनेही श्रीजय चव्हाण यांच्या मुलीविरोधात उमेदवार जाहीर केलाय. पप्पू उर्फ तिरुपती कदम कोंडेकर यांना भोकरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. 

काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी 

1.अक्कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)4.नवापूर -  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे6.धुळे ग्रामीण -  कुणाल रोहिदास पाटील7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे10.रिसोड - अमित सुभाषराव झनक11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख13.तेओसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख15.देवळी - रणजित प्रताप कांबळे16.नागपूर दक्षिण पश्चिम -  प्रफुल्ल विनोदराव गुडधे17.नागपूर मध्यवर्ती -  बंटी बाबा शेळके18.नागपूर पश्चिम -  विकास पी. ठाकरे19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत20 साकोली -  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले21.गोंदिया-  गोपालदास शंकरलाल अग्रवाल22.राजुरा-  सुभाष रामचंद्रराव धोटे23.ब्रह्मपुरी -  विजय नामदेवराव वडेट्टीवार24.चिमूर -  सतीश मनोहरराव वारजूकर25.हदगाव -  माधवराव निवृत्तीराव पवार पाटील26 भोकर-  तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर29 फुलंब्री -  विलास केशवराव औताडे30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर38 संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे40 लातूर - ग्रामीण धिरज विलासराव देशमुख41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण44 कोल्हापूर दक्षिण - रुतुराज संजय पाटील45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC) 47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम48 जाट - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार