मुंबई : काँग्रेसकडून (Congress) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून 48 उमेदवारांची नावे या यादीत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या पहिल्या यादीत 5 एसटी, 2 एससी आणि 3 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तसेच, पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये, लातूर जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दोन्ही चिरंजीवांना पुन्हा एकदा काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. तर, सोलापूर जिल्ह्यातून केवळ एकच उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. विदर्भातील नागपूर (Nagpur) शहरातून 4 जणांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत. त्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीसांविरुद्ध (Devendra Fadnavis) काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. 


महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर, काँग्रेसने 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. त्यामध्ये,  लातूर-ग्रामीणमधून धिरज विलासराव देशमुख आणि लातूर शहरातून अमित देशमुख यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय. तर, सोलापूर जिल्ह्यातून अक्कलकोटची एकमेव जागा जाहीर झाली आहे.  नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील उमेदवार ठरला आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून प्रफुल गुडघे पाटील. (प्रफुल गुढधे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढतील)काँग्रेसने पहिल्या यादीत 


सोलापुरात काँग्रेसचा एकच उमेदवार


काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील केवळ एका उमेदवाराचे नाव असून अक्कलकोट मतदारसंघातून पुन्हा एकदा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रेना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, अक्कलकोटमध्ये म्हेत्रे यांचा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी होणार सामना आहे. सोलापूर मध्य या जागेवर काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, या जागेवर पहिल्या यादीत उमेदवारी देण्यात आली नाही.  सोलापूर दक्षिण जागेवर काँग्रेसने दावा केलंय, इथे ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केलंय पण काँग्रेस लढवण्यावर ठाम होती. मात्र, पहिल्या यादीत या जागेवर उमेदवारी देण्यात आली नाही.  


नागपूरच्या 6 पैकी 4 उमेदवारांची घोषणा


नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता होती. पूर्व नागपूर आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेला आहे. काँग्रेसच्या वाट्यातील पाच मतदारसंघांपैकी काँग्रेसने आज चार मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले आहे. मात्र, ज्या दक्षिण नागपूर मतदार संघासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये जोरदार वाद पेटले होते. ती जागा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विदर्भातील जागांबद्दलचा वाद अजूनही पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही, हेच या यादीवरून दिसून येत आहे.


नागपूर शहरातील 4 उमेदवार जाहीर 


नागपूर उत्तर मधून डॉ.नितीन राऊत 
नागपूर पश्चिम मधून विकास ठाकरे 
नागपूर मध्य मधून बंटी शेळके
नागपूर दक्षिण पश्चिम मधून प्रफुल गुडघे पाटील (प्रफुल गुढधे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढतील)


विशेष म्हणजे आजच्या काँग्रेसच्या यादीत नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर करण्यात आलेलं नाही. ग्रामीण भागातील अनेक उमेदवारांसंदर्भात काँग्रेसचे नेते सुनील केदार आग्रही आहे. त्यामुळे, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदारसंघ सध्या होल्ड वर ठेवले आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.


हेही वाचा


रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?