Dhanteras 2024 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होतेय. धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2024) दिवशी लक्ष्मी देवी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. सुख-समृद्धी आणि संपत्तीसाठी प्रार्थना करतात. तसेच, यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 100 वर्षांनी त्रिग्रही योग, त्रिपुष्कर योग, इंद्र योग, वैधृति योग आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्र असे महासंयोग जुळून येणार आहेत. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिक वाढणार आहे. तसेच, या दिवशी प्रदोष व्रतसुद्धा असतो. यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी 1 तास 41 मिनिटांनी शुभ मुहूर्त असणार आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरीची पूजा करतात
धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवी, कुबेर आणि धन्वंतरीची पूजा करतात. देवी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केल्याने सुख-समृद्धीत वाढ होते. तसेच, व्यक्तीला चांगलं आरोग्य लाभते आणि कुटुंबातील वातावरणही प्रसन्न राहते. यामुळे या दिवसाचं फार महत्त्व आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी 'अशी' करा पूजा
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी उत्तर दिशेला भगवान कुबेर, आणि धन्वंतरी तसेच देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच, पूजा करताना कुबेर मंत्राचा जप करावा. त्यानंतर धन्वंतरी स्त्रोताचं पठण करावं. त्यानंतर, भगवान गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. त्यानंतर देवाला प्रसाद आणि फूल अर्पण करावेत. तसेच, धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दारापाशी दिवे लावण्याची परंपरा आहे.
धनत्रयोदशी पूजा शुभ मुहूर्त (Dhanteras 2024 Shubh Muhurta)
धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो. पंचांगानुसार, यंदा पूजेचा शुभ मुहूर्त 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:04 ते 8:27 पर्यंत असेल, अशात तुम्हाला पूजा करण्यासाठी सुमारे 1 तास 23 मिनिटांचा वेळ मिळेल.
- प्रदोष काळ: संध्याकाळी 6:01 वाजेपासून ते रात्री 8:27 पर्यंत असणार आहे.
- वृषभ काळ: संध्याकाळी 7:04 ते रात्री 9:08 पर्यंत असणार आहे.
- त्रयोदशी तिथी प्रारंभ: 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:31 पर्यंत असणार आहे.
- त्रयोदशी तिथी समाप्त: 30 ऑक्टोबर 2024 दुपारी 1:15 पर्यंत असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: