छत्रपती संभाजीनगर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. संजय शिरसाट यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 13 पटीने वाढ झाली आहे.


तर छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपने मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्यावर  तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. या मतदारसंघात सावे यांनी दोनदा कमळ फुलवले आहे. त्यांच्यामागे राजकारणाचा मोठा वारसा आहे. अतुल सावे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अतुल सावे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. यानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात १७ कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 


संजय शिरसाट यांची संपत्ती (Sanjay Shirsat Property)


जंगम संपत्ती 


2019 मध्ये 1.21 कोटी 


2024 मध्ये 13.37 कोटी 


स्थावर संपत्ती 


2019 मध्ये 1.24 कोटी


2024 मध्ये 19.65 कोटी


सोने


2019 मध्ये 16 कोटी


2024 मध्ये 1.42 कोटी


ठेवी


2019 मध्ये 5 लाख


2024 मध्ये 81 लाख


वाहने 


2019 मध्ये 85 लाख


2024 मध्ये 18 लाख


अतुल सावे यांची संपत्ती (Atul Save Property)


जंगम संपत्ती 


2019 मध्ये 15.69 कोटी 


2024 मध्ये 28.79 कोटी 


स्थावर संपत्ती 


2019 मध्ये 6.32 कोटी


2024 मध्ये 10.40 कोटी


सोने


2019 मध्ये 2.71 लाख


2024 मध्ये 32.02 लाख


रोख


2019 मध्ये 28.10 कोटी


2024 मध्ये 1.26 कोटी 


वाहने 


2019 मध्ये 11.77 लाख


2024 मध्ये 58.51 लाख


दरम्यान, भाजपातून आलेल्या नेत्याला संजय शिरसाटांविरोधात उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संजय शिरसाट यांच्याविरोधात भाजपातून आलेल्या राजू शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून या मतदारसंघातून कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संजय शिरसाटांनी 15 वर्षात विकासच केला नसल्याचा आरोप ठाकरे गटाच्या राजू शिंदेंनी शिरसाटांवर केलाय. तर मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे आपणच विजयी होऊ, असा विश्वास संजय शिरसाटांनी व्यक्त केलाय. संभाजीनगर पश्चिम हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून संजय शिरसाट सलग तीन वेळा निवडून आले आहेत. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर मतदारसंघाचं समीकरण बदललंय. तर 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणाऱ्या राजू शिंदेंना आयात करत ठाकरेंनी संजय शिरसाटांची कोंडी केली आहे.


आणखी वाचा 


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; यामिनी जाधवांविरुद्ध मोठी खेळी, धुळ्यातून अनिल गोटे यांना संधी