एक्स्प्लोर

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये आज 18 जागांसाठी, तर उरलेल्या 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यात निवडणुका शांततेत पार पडाव्या, कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. छत्तीसगड विधानसभेच्या 18 जागांसाठी आज मतदान होत आहे. दहा जागांसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत याठिकाणी मतदान होणार आहे. तर इतर आठ जागांसाठी मतदान 8 वाजता सुरूवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.

छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये आज 18 जागांसाठी, तर उरलेल्या 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नक्षलवाद्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी तीन वेळा हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक जवान जखमी झाले, अनेक नागरिकांचाही यामध्ये मृत्यू झाला.

या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास सव्वा लाख जवान विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

नक्षलग्रस्त भागातील आठ जिल्ह्यात मुख्यमंत्री रमन सिंह यांच्यासह 190 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

छत्तीसगडमधील चित्र काय? छत्तीसगड विधानसभेत 90 आणि लोकसभेच्या 11 जागा आहेत. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 आणि काँग्रेसने 39 जागांवर विजय मिळवला होता. तर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत 10 जागा भाजपला आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती. डॉ. रमन सिंह 7 डिसेंबर 2003 रोजी मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.

 संबंधित बातम्या 

छत्तीसगड ओपिनियन पोल : 15 वर्षांनंतर भाजपच्या हातून सत्ता जाण्याची चिन्हं

मोदींच्या दौऱ्यापूर्वी दंतेवाड्यात नक्षली हल्ला, एका जवानासह 4 जणांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
Embed widget