Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election Result 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी विशेष ठरली. या निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघ विशेष रुपाने चर्चेत राहीले. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचाही (औरंगाबाद) समावेश आहे. या मतदारसंघात एमआयएम पक्षाचे नेते तथा विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचे नेते तथा मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यात प्रमुख लढत झाली. म्हणूनच तिरंगी लढत झालेल्या या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. 13 मे 2024 रोजी या मतदारसंघात मतदान झालं. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या मतदारसंघात एकूण 63.07 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान या मतदारसंघातील निकाल आता स्पष्ट झाला आहे. या जागेवर संदिपान भुमरे हे 1 लाख 34 हजार 650 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. 

                     उमेदवाराचे नाव                               पक्ष                                निकाल
                        चंद्रकांत खैरे             शिवसेना (ठाकरे गट)                        पराभूत (293450 मते)
                       संदिपान भुमरे             शिवसेना (शिंदे गट)                         विजयी (476130 मते)
                       इम्तियाज जलील              AIMIM                         पराभूत (341480 मते)

संभाजीनगर फेरीनिहाय मिळालेली मते आणि आघाडी

पहिली फेरी

संदीपन भुमरे 16407

चंद्रकांत खैरे 11429

इम्तियाज जलील 1974 5

फेरीअंती इम्तियाज जलील 3338 मतांनी आघाडीवर

दुसरी फेरी

संदीपन भुमरे : 33419

चंद्रकांत खैरे 22243

इम्तियाज जलील 35691

फेरीअंती इम्तियाज 2272 मतांनी आघाडीवर

तिसरी फेरी

संदीपन भुमरे 50946

चंद्रकांत खैरे : 35506

इम्तियाज जलील 50718

तिसऱ्या फेरीअंती संदीपन भुमरे 228 मतांनी आघाडीवर

चौथी फेरी

संदीपन भुमरे  70455

चंद्रकांत खैरे 48297

इम्तियाज जलील 64434

चौथ्या फेरीअंती भुमरे 6021 मतांनी आघाडीवर

पाचवी फेरी

संदीपन भुमरे 86586

चंद्रकांत खैरे 58270

इम्तियाज जलील 84637


पाचव्या फेरीअंती भुमरे 1949 मतांनी आघाडीवर

सहावी फेरी 

संदीपन भुमरे :  106421

चंद्रकांत खैरे : 70223

इम्तियाज जलील : 99101

सहाव्या फेरीअंती भुमरे 7320 मतांनी आघाडीवर

सातवी फेरी

संदीपन भुमरे  124703

चंद्रकांत खैरे 81726

इम्तियाज जलील 114518

सातव्या फेरीअंती भुमरे 10185 मतांनी आघाडीवर

आठवी फेरी

संदीपन भुमरे 145436

चंद्रकांत खैरे 94658

इम्तियाज जलील 128693

आठव्या फेरीअंती भुमरे 16743मतांनी आघाडीवर

नववी फेरी

संदीपन भुमरे 166660

चंद्रकांत खैरे 107310

इम्तियाज जलील  143866

नवव्या फेरीअंती भुमरे 22794  मतांनी आघाडीवर

दहावी फेरी

संदीपन भुमरे : 186177

चंद्रकांत खैरे : 116440

इम्तियाज जलील 159228

10 व्या फेरीअंती भुमरे 26949  मतांनी आघाडीवर

अकरावी फेरी

संदीपन भुमरे  :  205699

चंद्रकांत खैरे : 127718

इम्तियाज जलील 171808

11व्या फेरीअंती भुमरे 33891  मतांनी आघाडीवर

बारावी फेरी

संदीपन भुमरे : 223250

चंद्रकांत खैरे 139251

इम्तियाज जलील 187114

12व्या फेरीअंती भुमरे 36136 मतांनी आघाडीवर

तेरावी फेरी

संदीपन भुमरे : 241987

चंद्रकांत खैरे : 151081

इम्तियाज जलील : 199762

13व्या फेरीअंती भुमरे 42219 मतांनी आघाडीवर

चौदावी फेरी

संदीपन भुमरे  260031

चंद्रकांत खैरे 162010

इम्तियाज जलील 216239

14 व्या फेरीअखेर भुमरे 43792 मतांनी आघाडीवर

पंधरावी फेरी 

संदीपन भुमरे  278704

चंद्रकांत खैरे 172974

इम्तियाज जलील 233388

15th फेरीअखेर भुमरे 45316 मतांनी विजयी

सोळावी फेरी

संदीपन भुमरे : 301690

चंद्रकांत खैरे 185313

इम्तियाज जलील : 246824

16th फेरीअखेर भुमरे 54866 मतांनी आघाडीवर

-----------------------------

ठळक वैशिष्ट्ये

1 -छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात.

2 -या चार मतदारसंघात संदिपान भुमरे यांना सर्वाधिक मतं मिळाली तर इम्तियाज जलील यांना औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व या मतदारसंघात आघाडी मिळाली आहे.

3-संदिपान भुमरे यांना सर्वाधिक आघाडी गंगापूर या मतदारसंघातून मिळाली.

4-सहाही मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा संदिपान भुमरे यांना अधिकची लीड.

5-वंचित आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची जाधव यावेळी चालली नाही..


छत्रपती संभाजी नगर लोकसभेमध्ये विधानसभानिहाय मिळालेली मते..

कन्नड विधानसभा (आमदार- उदयसिंग राजपूत उद्धव ठाकरे सेना)

झालेले मतदान 217085

चंद्रकांत खैरे-42338
संदीपान भुमरे-68220
इम्तियाज जलील-37216

भुमरे यांना कन्नड विधानसभा मधून मिलेलेली लीड 25892 मतांची लीड

औरंगाबाद मध्य ( आमदार प्रदीप जयस्वाल शिंदे सेना)

झालेलं मतदान 210180

चंद्रकांत खैरे-43480
संदीपान भुमरे-59740
इम्तियाज जलील -85937

औरंगाबाद मध्य विधानसभा क्षेत्रातून इम्तियाज जलील यांना 26197 मतांची आघाडी

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ (आमदार संजय शिरसाट सिंदे सेना)

झालेलं मतदान 235783

चंद्रकांत खैरे -58382
संदीपान भुमरे-95586
इम्तियाज जलील- 54817

औरंगाबाद पश्चिम या मतदारसंघातून संदिपान भुमरे यांना 37204 मतांची आघाडी

 औरंगाबाद पूर्व मतदार संघ( विद्यमान आमदार अतुल सावे भाजप)

झालेले मतदान 206633

चंद्रकांत खैरे -38350
संदिपान भुमरे -63228
इम्तियाज जलील-89143

औरंगाबाद पूर्व मतदार संघातून इम्तियाज जलील यांना 25915 मतांची आघाडी

गंगापूर विधानसभा क्षेत्र (विद्यमान आमदार प्रशांत बंब भाजप)

झालेले मतदान 227156

चंद्रकांत खैरे -53113
संदिपान भुमरे -94419
इम्तियाज जलील-48541

गंगापूर मतदारसंघातून संदिपान भुमरे यांना 41306 मतांची आघाडी

वैजापूर विधानसभा क्षेत्र (विद्यमान आमदार रमेश बोरणारे शिंदे सेना)

झालेलं मतदान 200887

चंद्रकांत खैरे -56207
संदिपान भुमरे -93231
इम्तियाज जलील-25223

संदिपान भुमरे यांना 37004 एवढ्या मतांची आघाडी मिळाली..

छत्रपती संभाजीनगरमध्ये अटीतटीची लढत!

छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) यावेळी जातीय समीकरण फार महत्त्वाचं ठरलं. याआधीच्या अनेक निवडणुकांत संभाजीनगरात 'खान की बाण' हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. पण यावेळच्या निवडणुकीत ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दादेखील तेवढाच महत्त्वाचा ठरला. 

एकूण किती मतदार? महिला, पुरुष मतदार किती?

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 59 हजार 710  मतदार आहेत. त्यात 10 लाख 77 हजार 809  पुरुष तर 9 लाख 81 हजार 773 महिला व 128 इतर मतदार आहेत. यातील 12 लाख 99 हजार 40 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या जागेवर एकूण 63.07  टक्के मतदान झाले आहे. मतदान केलेल्यांमध्ये 7 लाख 9 हजार 816 पुरुष मतदार तर 5 लाख 89  हजार 184 महिला मतदार आणि 40 इतर मतदार होते.

खैरेंचा प्रचार कसा राहिला? 

उमेदवारी जाहीर होताच चंद्रकांत खैरे यांनी पहिल्या दिवसापासून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. खैरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. त्यामुळेच त्यांनी प्रचारात मुस्लीम मतदारांशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला. त्याचा काही ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसला. कारण काही भागांत मुस्लिमांनी खैरे यांना मतदान केल्याचं दिसलं.  मोदींना सत्तेतून हटवायचं असेल तर काँग्रेसला साथ द्यावी लागेल त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत द्यावे लागेल, असा विचार यामागे होता. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे काही भागात उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे. त्याचा परिणाम म्हणून काही लोकांनी खैरे यांना मतदान केले. 

भूमरेंनी प्रचारासाठी कोणतं तंत्र वापरलं? 

खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुढचे अनेक दिवस महायुतीने छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. याच कारणामुळे भुमरे यांना प्रचारासाठी कमी दिवस मिळाले. तसं पाहायचं झाल्यास या मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद आहे. भुमरे स्वत: राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. तसेच ते संभाजीनगरचे पालकमंत्रीदेखील आहेत. मित्रपक्ष भाजपचे मिळून या जिल्ह्यात महायुतीचे एकूण पाच मंत्री आहेत. त्यामुळे ही संपूर्ण ताकद भुमरे यांच्या पाठीमागे होती. पण प्रचारात भुमरे यांना दारुवाला उमेदवार म्हणून लक्ष्य करण्यात आलं. तसेच या मतदारसंघात आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा समाज नाराज होता. मात्र या सर्व नाराजीला दूर सारत भुमरे यांनी विजयी कामगिरी केली. 

जलील अपयशी, मिळाली दुसऱ्या क्रमांकाची मते

इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे जलिल यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत 2019 सालची निवडणूक जिंकली होती. मात्र यावेळची निवडणूक जलील यांच्यासाठी फार सोपी नव्हती.  यावेळी अनेक मुस्लीम मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी राहिल्याचे दिसले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचाही त्यांना पाठिंबा नव्हता त्यामुळे यावेळी जलील यांना दलित मतदारांचीही हवी तेवढी साथ मिळालेली नाही. त्यामुळे जलील यांच्यासाठी ही निवडणूक कठीण ठरल्याचा दावा केला जातोय. जलील यांनी काही दिवसांपूर्वी आदर्श घोटाळ्याविरोधात मोठे आंदोलन उभे केले होते. त्याचा फायदा जलील यांना होण्याची शक्यता होती. पण जलील यांना यश मिळाले नाही. 

हेही वाचा :

राज्याला पाणीटंचाईच्या संकटाने घेरले; मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.98 टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये तीव्र पाणीटंचाई