एक्स्प्लोर

आमदार बाळू धानोरकर शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसकडून निवडणूक लढवणार?

युतीमध्ये असताना हंसराज अहिर यांनी आतापर्यंत निवडणुकीत कोणतीही मदत केली नाही, असा आरोप बाळू धानोरकर यांनी केला आहे.

चंद्रपूर : शिवसेना-भाजप युतीचा पहिला साईड इफेक्ट चंद्रपुरात दिसत आहे. कारण नाराज वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर हे शिवसेना पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये प्रवेश करुन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यासंदर्भात त्यांनी 28 फेब्रुवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची भेट घेतल्याचंही कळतं. शिवसेनेच्या 12 पैकी एका मंत्र्यांनेही काम केलं नाही : बाळू धानोरकर बाळू धानोरकर आणि हंसराज अहिर यांच्या टोकाचे मतभेद आहेत. युतीमध्ये असताना हंसराज अहिर यांनी आतापर्यंत निवडणुकीत कोणतीही मदत केली नाही, असा आरोप बाळू धानोरकर यांनी केला आहे. त्यामुळे बाळू धानोकरांनी अहिर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. शरद पवारांचे हात बळकट करणार, डॉ. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश युती झाल्याने निवडणूक लढवणार नसल्याचं बाळू धानोरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचं कळतं. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवून हंसराज अहिर यांना आव्हान देण्याची इच्छा धानोरकर यांनी बोलून दाखवली. चंद्रपूर लोकसभा मतदार संघ : युती न झाल्यास हंसराज अहिरांना शिवसेनेकडून तगडी टक्कर काही दिवसांपूर्वीच स्टार प्रचारक अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता बाळू धानोरकर हे देखील शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं कळतं.

EXCLUSIVE | शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांची विशेष मुलाखत | चंद्रपूर | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
Someshwar Karkhana Election : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
Embed widget