एक्स्प्लोर

भाजपचं मिशन बंडखोर, 27 मतदारसंघात 114 बंडोबांना थंड करण्याचे मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान

मित्रपक्षांना जागा सोडल्या असल्या तरी त्यापैकीही बहुतांश ठिकाणी उमेदवार भाजपनेच ठरवला आहे. त्यामुळे या सर्व मतदारसंघात स्थानिक पातळीवर असंतोष असून अनेकांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

मुंबई : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता भाजप समोर बंडोबांना थंड करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.  288 मतदारसंघात मित्रपक्षांसह भाजपच्या कमळावर तब्बल 164 अधिकृत उमेदवारांनी भाजपच्या बी फॉर्म वर उमेदवारी अर्ज भरला आहे. यामध्ये अनेक उमेदवार आयात केलेले आहेत तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मित्रपक्षांना जागा सोडल्या असल्या तरी त्यापैकीही बहुतांश ठिकाणी उमेदवार भाजपनेच ठरवला आहे. त्यामुळे या सर्व मतदारसंघात स्थानिक पातळीवर असंतोष असून अनेकांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत. सध्यस्थीती पाहता खरंतर भाजपच्या 'अब की बार 220 पार' या नाऱ्याला बंडोबा मोठा सुरुंग लावू शकतात. त्यामुळे या बंडोबांना शांत करून त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणीचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उद्या म्हणजे 7 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.  मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व दौरे रद्द करून ते सध्या मुंबईत ठाण मांडून बसलेत. प्रत्येक बंडखोराला हॉटलाईनवर संपर्क साधून आश्वासनांची खैरात दिली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. तरीही उमेदवारी मागे घेतली नाही तर महायुतीत यापुढे कुठलंही स्थान नसेल असं मुख्यमंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे. भाजपने अशा एकूण 114 बंडखोरांची तयार केलेली यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 27 मतदारसंघात या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक बंडखोरी कोल्हापूरच्या चंदगड या मतदारसंघात पाहायला मिळतेय. चंदवडच्या जागेवर भाजपचा डोळा होता मात्र या जागी शिवसेनेचा उमेदवार लढत असून याठिकाणी एकूण 9 बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाडापाडीचं राजकारण रंगणार आणि त्याचा फटका महायुतीला बसणार अशी चिन्ह दिसतायत. त्यामुळे किती जण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतात आणि किती बंडखोर भाजपची डोकेदुखी वाढवतात यावरून भाजपचं सत्ता स्थापनेचं गणित ठरणार एवढं निश्चित.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Manoj Jarange Patil at Jantar Mantar: मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, 'माझी हिंदी ऐकाल तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
Embed widget