एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घाला, गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी बॅनर्स लावले
उमेदवारांना नक्षली जन अदालतमध्ये उभे करण्याचे आवाहन देखील केले आहे. भाजप, आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटनांनी देशातील श्रमिकांचे नुकसान केल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे.
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नक्षलवाद्यांनी मतप्रदर्शन केले आहे. धानोरा तालुक्यातील देवसूर येथे नक्षलवाद्यांनी बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सद्वारे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच उमेदवारांना नक्षली जन अदालतमध्ये उभे करण्याचे आवाहन देखील केले आहे. भाजप, आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटनांनी देशातील श्रमिकांचे नुकसान केल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे.
जनतेविरोधी भाजपला धडा शिकवा. दलित, मुस्लिम, आदिवासी, इतर मागासवर्गीय, महिलाविरोधी भाजपला धडा शिकवा, असे नक्षलवाद्यांनी लावलेल्या पोस्टरवर म्हटले आहे.
मजूर, शिक्षक आणि कर्मचारी विरोधी सरकारला पळवून लावा. मत मागायला आलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना जनअदालत मध्ये उभे करुन त्यांना प्रश्न विचारा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement