Uttarakhand Election Result 2022: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील निवडणुकांचे निकाल आज समोर आले आहेत. पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपने बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकला आहे. भाजपने 70 पैकी 47 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर 19 जागांसह काँग्रेस आहे. दरम्यान 70 पैकी 36 हा मॅजिक फिगर असल्याने भाजपने हा आकडा आधीच मिळवल्याने मुख्यमंत्री त्यांचाच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, उत्तराखंडमध्ये 70 जागांपैकी 47 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार 18 जागांवर विजयी झाले असून एका जागेवर आघाडीवर आहेत. दोन अपक्ष उमेदवार निवडून आले असून बहुजन समाज पार्टीने एका जागेवर विजयासह एका जागेवर आघाडी घेतली आहे.
उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. यंदा 65.37 टक्के मतदान पार पडलं. ज्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळली आहे. ज्यात भाजप 40.8 टक्के मतांनी सरस ठरल्याचं दिसत असून काँग्रेस 39.3 टक्के मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आपला 8.7 टक्के आणि 11 टक्के जागा इतरांच्या पदरात पडल्या आहेत.
2017 मध्ये भाजपला होतं बहुमत
उत्तराखंडमध्ये 2017 विधानसभा निवडणूकीच्या वेळी भाजपला बहुमत मिळालं होतं. भाजपने तब्बल 56 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसला मात्र 11 जागाच मिळवण्यात यश आलं होतं. तर तीन जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या होत्या. उत्तराखंडमध्ये 2017 साली 65.56 टक्के मतदान झालं होतं तर यंदा मात्र 65.37 टक्के मतदानाची टक्केवारी आहे.
हे ही वाचा-
- Punjab Election Result : पंजाबमध्ये 'आप'ची त्सुनामी, मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवर हरले, उपमुख्यमंत्र्यांनाही धक्का
- Punjab Election Result 2022 Live : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पराभव
- Manipur Election Result 2022: मणिपूरमध्ये भाजपचं कमळ फुललं, पाहा विजयी उमेदवारांची यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha