Manipur Election Result 2022: मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीचे बहुते निकाल हाती आले असून यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. भाजप उमेदवार आतापर्यंत 60 पैकी 28 जागी विजयी झाले  आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांत भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 09, एनपीपी 09 आणि इतर 08 जागांवर आघाडीवर आहेत. तर विजयी उमेदवारांच्या यादीवर एक नजर फिरवुया...

मतदारसंघउमेदवारपक्ष
खुंद्रकपमठोकचोम लोकेश्वर सिंह (Thokchom Lokeshwar Singh)काँग्रेस
वांगखेमकेशम मेघचंद्र सिंग (Keisham Meghachandra Singh)काँग्रेस
केसमथोंगसपम निशिकांत सिंह (SAPAM NISHIKANT SINGH)अपक्ष
वांगोईखुरैजम लोकेन सिंह (KHURAIJAM LOKEN SINGH)एपीपी
थांगमेईबंदखुमुकचम जॉयकिसन सिंह (Khumukcham Joykisan Singh)जनता दल
टिपाईमुखन्गुरसांगलूर सनते (Ngursanglur Sanate)जनता दल
जिरिबममो. अछाब उद्दीन  (MD. ACHAB UDDIN)जनता दल
वाबगईडॉ.उषम देबेन सिंह (Dr.USHAM DEBEN SINGH)भाजप
याइस्कुलठोकचोम सत्यब्रत सिंग (Thokchom Satyabrata Singh)भाजप
हेनगंगनॉंगथोम्बम बीरेन सिंग (NONGTHOMBAM BIREN SINGH)भाजप
थंगाटोंगब्रम रॉबिंद्रो सिंग (Tongbram Robindro Singh)भाजप 
कांगपोकपीनेमचा किपगेन (Nemcha Kipgen)भाजप
केरावलोरेम्बम रामेश्वर मीतेई (Lourembam Rameshwor Meetei)भाजप
कोन्थौजम डॉ. सपम रंजन सिंह (Dr. Sapam Ranjan Singh)भाजप
हियांगलामडॉ. युम्नाम राधेश्याम सिंह (DR. YUMNAM RADHESHYAM SINGH)भाजप
खेत्रीगावशेख नूरुल हसन (Sheikh Noorul Hassan)एनपीपी
हेंगलेप लेटझामंग हाओकिप (Letzamang Haokip)भाजप
लंगथबल करम श्याम (Karam Shyam) भाजप
सैतुहाओखोलेत किपगन (Haokholet Kipgen)अपक्ष

2017 मध्ये काँग्रेस ठरला होता सर्वात मोठा पक्ष  

2017 च्या निवडणुकीत 28 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र भाजपने काँग्रेच्या काही आमदारांमध्ये फूट पाडून आपल्या सोबत घेतले आणि सत्ता स्थापन केली. दरम्यान, या निवडणुकीत जरी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी भाजपला मॅजिक फिगर 31 गाठण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागू शकते.   

पंजाब सोडता भाजपचा बोलबाला

देशातील पाच राज्यात पार पडलेल्या या निवडणूकीत पंजाब सोडता मणिपूरसह उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड या चारही राज्यात भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार उपीमध्ये 263, उत्तराखंडमध्ये 49 आणि गोव्यात 20 जागांवर भाजप पुढे आहे.  

हे ही वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha