UP Election Results : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे कल आत्तापर्यंत बऱ्यापैकी हाती आले आहेत. यातील महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. जवळपास 250 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर 110 जागांवर समाजवादी पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे यूपीमध्ये पुन्हा भाजपच सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, युपीमध्ये सुरुवातीला 400 च्या पुढे आणि त्यानंतर 300 च्या पुढे जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी डनतेनं नाकारलं आहे. अखिलेश यांचे नेमकं काय चुकले? की त्यांनी यूपीच्या जनतेनं दुसऱ्यांदा नाकारले आहे.


यूपीमध्ये भाजप सध्या 250 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र, अखिलेश यादव यावेळी देखील यूपीमध्ये सत्ता स्थापन करण्यास यशस्वी झाले नाहीत, असेच म्हणावे लागेल. कारण सध्या भाजप बहुमताच्या पुढे गेली आहे.


निवडणूक प्रचारसभा आणि रॅलींमध्ये अखिलेश यादव यांनी पूर्ण आत्मविश्वासाने दावा केला होता की यावेळी सपा सरकार स्थापन करेल. सुरुवातीला अखिलेश यादव यांनी 400 पारचा नाराही दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी 300 च्या पुढे जागा जिंकण्याचा दावा केला होता. दरम्यान, अखिलेश यादव यांच्या सभांनाही मोठी गर्दी होत होती. मात्र, गर्दीचे रुपांतर मतात झाले नसल्याचे सध्या हाती येणाऱ्या कलावरुन समजत आहे. सपाचा जाहीर केलेल्या जाहीरनाम्याचीही यावेळी जोरदर चर्चा झाली. प्रचारावेळी अखिलेश यांनी भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही जोरदार निशाणा साधला होता. टीका करताना अखिलेश यांनी कोणतीही कसर सोडली नाही. मात्र, आता त्यांचे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी करहल मतदारसंघातून भक्कम आघाडी कायम ठेवली आहे.


दोन दिवसापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्येही देखील भाजपच्या सर्वात जास्त जागा जिंकणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अखिलेश यादव यांनीही ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर भाजपनेही अखिलेश यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, यूपीमध्ये मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीचे राजकारण नाकारण्याचे आवाहन उत्तर प्रदेशच्या जनतेला केले होते. त्याला मतदारांनी प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: