Hrithik-Saba Wedding : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट झाले होते, तेव्हापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. या नंतरही हातात हात घालून, दोघेही आता अनेकदा स्पॉट झाले आहेत. हृतिकचे कुटुंब सबा आझादसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकने सबासाठी घरी बनवलेले जेवणही पाठवले होते, त्याविषयी सबाने एक पोस्ट शेअर केली होती.


सबा आणि हृतिकची माजी पत्नी सुझानचीही चांगली बॉन्डिंग होती. आता, दोघांच्या भेटीगाठीमुळे त्यांच्या लग्नाच्या अफवांना हवा मिळाली आहे. मात्र, दोघांनीही या गुप्त नात्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. आता हृतिकच्या मित्राने दोघांच्या लग्नासंदर्भात खुलासा केला आहे. 


मित्राने केला खुलासा!


हृतिक आणि सबाच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, ‘दोघेही एकमेकांना आवडतात. हृतिकच्या कुटुंबाला सबा खूप आवडते. हृतिकप्रमाणेच, कुटुंबाला सबाचे संगीत क्षेत्रातील काम आवडते. नुकतीच सबा घरी आली तेव्हा तिने कुटुंबासोबत म्युझिक सेशन केले. हृतिक आणि सबा एकत्र आहेत, पण त्यांना रिलेशनशिपमध्ये अजिबात घाई करायची नाही. अजून लग्नाचा निर्णय घ्यायला वेळ असेल.’


हृतिक रोशन आणि सबा आझाद एका ऑनलाइन डेटिंग अॅपवर भेटल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, नवीन रिपोर्ट्सनुसार दोघांच्या मैत्रीची सुरुवात ट्विटरवरून झाली. बीटीच्या रिपोर्टनुसार, हृतिक रोशन आणि सबा गेल्या 2-3 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.


अशी झाली सुरुवात!


रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये सबा आणि एक रॅपर होते, तेव्हापासून त्यांची मैत्री सुरू झाली. सबाने हृतिकचे कौतुक केल्याबद्दल त्याचे आभार मानले आणि त्यानंतर डीएमच्या माध्यमातून दोघांमध्ये संवाद सुरू झाला.


सबा आझाद शेवट सोनी लिव्ह वेब सीरीज 'रॉकेट बॉईज' मध्ये दिसली होती. या शोमध्ये तो परवाना इराणीच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत जिम सरभ आणि इश्वाक सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. दुसरीकडे हृतिक रोशन त्याच्या आगामी 'विक्रम वेधा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha